
राजर्षि शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेच्या रत्नागिरी शाखेचे नवीन वास्तूत स्थलांतर
१३ (टू़डे ३ साठी)
----
- rat५p१.jpg-
२३M००६५०
रत्नागिरी ः राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप बँक रत्नागिरी शाखेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता छाया नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी.
गव्हमेंट सर्व्हंट्स बँकेचे नवीन वास्तूत स्थलांतर
रत्नागिरी, ता. ५ ः राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँक लि., कोल्हापूर या बँकेची रत्नागिरी शाखा बीएसएनलजवळ जेलरोड, रत्नागिरी येथे नवीन वास्तूत स्थलांतरित झाली आहे. तेथील उद्घाटन सोहळा पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांच्या हस्ते झाले . या वेळी तहसीलदार हणमंत म्हेत्रे, बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले, उपाध्यक्ष रमेश घाटगे, संचालक रवींद्र पंदारे, मधुकर पाटील यांच्यासह सभासद, ठेवीदार उपस्थित होते. बँकेचे संचालक रोहित बांदिवडेकर यांनी प्रास्ताविक करून बँकेचा प्रगतीदर्शक आढावा सादर केला. बँकेने १०७व्या वर्षात पदार्पण केले आहे. शतकोत्तर वाटचाल करणारी आपली बँक ही महाराष्ट्र राज्यातील पगारदार नोकरांची प्रथम क्रमांकाची सहकारी बँक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची व राज्यातील ७व्या क्रमांकाची सहकारी बँक आहे, असे बांदिवडेकर यांनी सांगितले. बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी उपस्थितांचे आभार मानून समारंभाचा समारोप केला.
----
संगमेश्वर रेल्वे थांब्यासाठी पत्र
कोकण रेल्वेमार्गावरील संगमेश्वर या स्थानकावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी स्थानिकांनी एका पत्राद्वारे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांच्याकडे केली आहे. दरवर्षी संगमेश्वर प्रवाशांमुळे कोकण रेल्वेला उत्पन्न मिळते, याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही संदेश जिमन यांनी सांगितले.
-