रत्नागिरी

रत्नागिरी

-rat४p३.jpg-
२३M००४४८
रत्नागिरी ः अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना संतोष कुलकर्णी.
----
गुणवंत तांत्रिक कर्मचारी पुरस्कार संतोष कुलकर्णी यांना प्रदान

रत्नागिरी, ता. ४ ः महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळात गुणवंत तांत्रिक कर्मचारी पुरस्कार संतोष विनायक उर्फ काका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. ते प्रधान यंत्रचालक असून, ३३/११ केव्ही हार्बर उपकेंद्र, विभाग रत्नागिरी शहर, उपविभाग रत्नागिरी शहर येथे कार्यरत आहेत. तेथे कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार, उपकेंद्राची देखभाल करणे, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, संभाव्य अपघात कार्यकौशल्याने टाळून उत्कृष्टपणे कर्तव्य बजावली आहेत. त्याकरिता दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पित वृत्ती या गुणांचा गौरव करून त्यांना कामगारदिनी सन २०२३ करिता उत्कृष्ट यंत्रचालक म्हणून सन्मानित करून प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. संतोष कुलकर्णी यांनी ३१ वर्ष प्रदीर्घ महामंडळ व महावितरण कंपनीत सेवा करून निवृत्तीला एक वर्ष असताना त्यांना हा बहुमान मिळाला. कुलकर्णी यांनी तांत्रिक कर्मचारी संघटनेचे २५ वर्षे काम केले. या कालावधीत विभागीय सचिव ते विभागीय अध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषवली आहेत.
--

फोटो ओळी
-rat४p९.jpg-
२३M००४५३
रत्नागिरी ः जनशिक्षण संस्थान आणि आर्या ब्युटी केअरतर्फे आयोजित ब्युटी कोर्समध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनी व संचालिका मेधा कुळकर्णी.
--
जनशिक्षण, आर्यातर्फे आयोजित ब्युटी कोर्सची सांगता

रत्नागिरी ः जनशिक्षण संस्थान आणि आर्या ब्युटीकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने ६० दिवसांचा ब्युटी असिस्टंट कोर्स आर्या ब्युटीकेअर येथे यशस्वीरित्या पार पडला. गृहिणी, कॉलेज विद्यार्थिनी अशा स्तरातील एकूण २० जणींनी या कोर्सद्वारे शिक्षण घेतले. त्याचे कौशल्य विकासअंतर्गत सरकारी प्रमाणपत्र मिळवून आता या २० विद्यार्थिनी ब्युटी असिस्टंट म्हणून काम करू शकतात. आर्या ब्युटीकेअरच्या संचालिका मेधा कुळकर्णी यांनी या महिलांना प्रशिक्षण दिले. या कोर्सबाबत या महिलांनी समाधान व्यक्त केले. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अशा कोर्सचा निश्चित उपयोग होतो, असे कुळकर्णी यांनी सांगितले.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com