रत्नागिरीत आज नाट्यअभंग

रत्नागिरीत आज नाट्यअभंग

१७ (टुडे ३ साठी)

साईश्री, वेदश्री प्रस्तुत आज रत्नागिरीत नाट्यअभंग

रत्नागिर ः साईश्री आणि वेदश्रीतर्फे नाट्यअभंग हा कार्यक्रम शनिवारी (ता. ६) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, नाट्यगृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने उपस्थित राहणार आहेत. नाट्यगीत आणि अभंग या संगीतातील दोन वेगवेगळ्या धाटणीच्या गीतांवर आधारित भरतनाट्यम् व कथ्थकचा नाट्यविष्कार सादर करणार आहेत. भरतनाट्यम् ही स्वतंत्र शैली आहे. ही दक्षिणात्य पद्धत असून, त्यात कर्नाटक संगीताचा वापर केला जातो तर कथ्थक हे उत्तर प्रदेशीय असून, त्यात हिंदुस्तानी संगीताचा वापर केला जातो. या दोन्ही संगीतातील गीतप्रकारांवर आपापल्या नाट्यविष्काराने प्रेक्षकांची नक्कीच मने जिंकून घेतली जातील. याद्वारे दोन्हीतील एकत्रितपणा, सारखेपणा आणि फरक दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही रत्नागिरीकरांसाठी सुंदर पर्वणी आहे. याचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा, असे आवाहन साईश्री वेदश्रीच्या संचालिका मिताली भिडे व रूपाली लिमये यांनी केले आहे.
---

rat५p२०.jpg-
२३M००६४०
रत्नागिरी ः विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित सीता नवमी सप्ताहात उपस्थित महिला.

विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरीत सीता नवमी सप्ताह

रत्नागिरी ः विश्व हिंदू परिषदेतर्फे सीतानवमी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी सीतामातेला वंदन करून सीताचरित्राचा अभ्यास केला. कार्यक्रमांमध्ये भजन, गीतगायन, व्याख्यान, कथाकथन यांचे आयोजन केले. शहरातील विविध भागात ५ ठिकाणी सीतानवमी कार्यक्रम साजरे करण्यात आले. महापतिव्रता सीतामाईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी सीतामाईचा आदर्श स्त्री शक्तीने समोर ठेवावा, अशा प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि सती महापतिव्रता सीता यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास व त्यांनी आचरलेल्या मुल्यांचे अनुकरणानेच आदर्श कुटुंब निर्माण होतील, अशी भावना या कार्यक्रमात व्यक्त झाली. सर्वच कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
-
केवळ फोटो

rat५p२१.jpg-
२३M००६४१
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चिपळूण येथील नूतन इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले. या इमारतीचे कल्पक डिझाईन आणि इंटेरिअर करणारे आर्किटेक्ट निखिल नांदगावकर आणि अहना गोडबोले यांचा सन्मान करताना आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि मान्यवर.
-----

rat५p२२.jpg-
२३M००६४२
कुर्धे ः येथील जि. प. शाळेत भरारी हस्तलिखिताचे प्रकाशन करताना उपसरपंच स्वाती शिंदे. सोबत मुख्याध्यापक, शिक्षक.

जि. प. शाळा कुर्धे येथे भरारी हस्तलिखिताचे प्रकाशन

पावस ः जि. प. शाळा कुर्धे येथे भरारी २०२३ या हस्तलिखिताचे प्रकाशन उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्वाती शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा मुख्य विषय यात मांडण्यात आला आहे. विविध कविता, गाणी, गोष्टी, माहिती, चित्रे यांचा खजाना यात आहे. यामुळे मुलांच्या विविध कलागुणांना यामुळे वाव मिळाला आहे. या हस्तलिखितासाठी मुख्याध्यापक विश्वजित नवाथे, शिक्षिका शहनाज भाटकर, कविता मयेकर, सूचित मयेकर, राजेंद्र रांगणकर या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहल कोटकर, पालक यांनी या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले‌.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com