
रत्नागिरीत आज नाट्यअभंग
rat५p२०.jpg-
२३M००६४०
रत्नागिरी ः विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित सीता नवमी सप्ताहात उपस्थित महिला.
विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरीत सीता नवमी सप्ताह
रत्नागिरी ः विश्व हिंदू परिषदेतर्फे सीतानवमी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी सीतामातेला वंदन करून सीताचरित्राचा अभ्यास केला. कार्यक्रमांमध्ये भजन, गीतगायन, व्याख्यान, कथाकथन यांचे आयोजन केले. शहरातील विविध भागात ५ ठिकाणी सीतानवमी कार्यक्रम साजरे करण्यात आले. महापतिव्रता सीतामाईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी सीतामाईचा आदर्श स्त्री शक्तीने समोर ठेवावा, अशा प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि सती महापतिव्रता सीता यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास व त्यांनी आचरलेल्या मुल्यांचे अनुकरणानेच आदर्श कुटुंब निर्माण होतील, अशी भावना या कार्यक्रमात व्यक्त झाली. सर्वच कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
-
केवळ फोटो
rat५p२१.jpg-
२३M००६४१
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चिपळूण येथील नूतन इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले. या इमारतीचे कल्पक डिझाईन आणि इंटेरिअर करणारे आर्किटेक्ट निखिल नांदगावकर आणि अहना गोडबोले यांचा सन्मान करताना आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि मान्यवर.
-----