Ramdas Kadam : अजित पवार यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली, पद गेल्यामुळेच थयथयाट

Ramdas Kadam
Ramdas Kadamesakal

अजित पवार यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली

रामदास कदम ; पद गेल्यामुळेच थयथयाट

खेड, ता. ५ ः अजित पवार यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली. त्यांना आधी जाब विचारा, अशी टीका रामदास कदम यांनी केली. वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगाने शिवसेना नेते रामदास कदम यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या टीकेला शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले तर अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. त्यामुळेच थयथयाट सुरू आहे. अजित पवार यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले. राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी वाटप करून अजित पवार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. वज्रमूठ सभेत टीका नाही तर थयथयाट केला.

टीका करण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दाच आहे कुठे? निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत; पण ज्या वेळी तुम्ही सत्तेत होता त्या वेळी निवडणुका का घेतल्या नाहीत, असा सवाल करत दुसऱ्याकडे एक बोट केले तर चार बोटे आपल्याकडे असतात याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असा सल्ला कदम यांनी या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com