
रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
swt५५.jpg
००६९२
वायरीः रेकोबा हायस्कूलच्या २००३-०४ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रशालेस भेट वस्तू दिली.
रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ येथे २००३-०४ च्या १० वी च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच श्रीमती विजयाताई गावकर सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेला वस्तू स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी ही मोठी शक्ती असते. त्यामुळे शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आणि शाळेच्या भौतिक विकासासाठी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला मदत करण्याचे आवाहन यानिमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांनी केले. माजी विद्यार्थी म्हणून मंदार आजगावकर, केतन आजगावकर, प्रभूदास आजगावकर, कमलेश वराडकर, नितीन कोळंबकर, सुशील डिचोलकर, मिलिंद वेतुरेकर, गौरी टेमकर, कविता देऊलकर, प्राजक्ता पाटकर, मनीषा गोलतकर, लीनता आचरेकर, रुपाली चव्हाण, रुपाली आंबेरकर, रेश्मा चव्हाण, विजया मसुरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. रामचंद्र गोसावी, प्रवीण कुबल, संभाजी कोरे, यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर यांनी केले.