रत्नागिरी-साडेतिनशे हेक्टरवर कलिंगडाची लागवड

रत्नागिरी-साडेतिनशे हेक्टरवर कलिंगडाची लागवड

फोटो ओळी
- rat५p२८.jpg-KOP२३M००६८१ कापलेले लाललाल कलिंगड
- rat५p२९.jpg-KOP२३M००६८२ कलिंगडाचा ढिग
- rat५p३०.jpg-KOP२३M००६८३ शेतातील कलिंगड दाखवताना शेतकरी

साडे तिनशे हेक्टरवर कलिंगडाची लागवड
कमी खर्चात हुकमी उत्पन्न ; उन्हामुळे एका बहराचे नुकसान, उच्चशिक्षित तरुणांकडून कलिंगड लागवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः कमी खर्चात हुकमी उत्पन्न देणाऱ्या कलिंगडाची पाच गुंठ्यापासून काही हेक्टरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात लागवड केली जात आहे. यंदा जिल्ह्यात साडेतिनशे हेक्टरवर लागवड करण्यात आली असून काही उच्चशिक्षीत तरुणही याकडे वळलेले आहेत. ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत तीन टप्प्यात यंदा पीक घेतले होते; मात्र उन्हाचा तडाखा या पिकाला बसल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील पिकातून अपेक्षित उत्पादन मिळालेले नसल्याचे शेतकऱ्‍यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यामध्ये भातशेती कापून झाली की रब्बी हंगामाची चाहूल लागते. जिल्ह्यात महिला बचत गटांसह अनेक शेतकरी पाणी असलेल्या ठिकाणी भाजीपाला लागवड करतात. गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कलिंगड लागवडीकडील शेतकऱ्‍यांचा ओढा वाढत आहे. पूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातून कलिंगड आणून येथे विकले जात होते. कमी दिवसात अधिक उत्पन्न मिळणारे पिक म्हणून याकडे पाहिले जाते. रोपांची लागवड केल्यानंतर साधारणपणे ७० ते ७२ दिवसांनी काढणी केली जाते. एक बहर झाला की पुन्हा दुसऱ्‍यांना रोप लावली जातात. सहा महिन्यात तीनवेळा लागवड करता येते. खेरवसेतील (ता. लांजा) जीवन माळी या तरुण शेतकऱ्‍याने जागा भाड्याने घेऊन शेतीचा विस्तार केला आहे.
जागेवर कलिंगडाला किलोला ११ ते १३ रुपये दर मिळतो. यंदा पावणेदोन एकरमध्ये २२ टन कलिंगड जीवन माळी यांनी काढली आहेत. त्याची विक्री झाली असून अकरा ते साडेअकरा रुपये किलोने दर मिळाला. ६ ते ८ किलो वजनाची फळं त्यांना मिळाली. दुसर्‍या लागवडीत ३५ टन फळं मिळाली.
कलिंगड लागवडीमधून पन्नास ते साठ टक्के नफा मिळतो. स्वतःचा टॅक्टर असल्यामुळे नांगरणीसाठी मोठा खर्च येत नाही. नांगरणी, बियाणे, औषधे आणि मजूर असा सुमारे ४५ ते ५० हजार रुपये खर्च सुरवातीला येतो. काढणीनंतर फळांची वाहतूक आणि मालकाचा मेहनताना हा खर्च त्यात समाविष्ट होतो. २२ टनाला पर किलो १२ रुपयेनुसार २ लाख ६४ हजार रुपये मिळतात. त्यातील सर्व खर्च वगळता पन्नास टक्के म्हणजेच साधारणपणे सव्वा लाख रुपये मिळतात.

चौकट
वन्यप्राण्याचे आव्हान
रानडुक्कर, माकडे यासारख्या वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना रान डुकरांसाठी दिवस-रात्र गस्त करावी लागत आहे. स्पीकरवर वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज लावून वन्यप्राण्यांना भिती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण महिन्याभरानंतर स्पीकरच्या आवाजाची भितीही प्राण्यांमधून निघून जाते. काही शेतकऱ्यांनी चार एकर जागेला सहा फुट उंचीचे शेडनेट लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खर्च करावा लागत आहे.
----
चौकट
दृष्टीक्षेपात जिल्ह्यातील कलिंगड लागवड
एकूण क्षेत्र ३४७.४० हेक्टर
उत्पादकता १५ ते २० टन प्रतिहेक्टरी
दर प्रतिकिलो १५ ते २० रुपये
हेक्टरी २ लाख २५ हजार उत्पन्न
एक लाख रुपयांपर्यंत नफा शक्य
--------------
चौकट
कलिंगड लागवड २०२२-२३
तालुका क्षेत्र (हेक्टर)
रत्नागिरी१०.७०
लांजा८.५६
राजापूर३१.१५
चिपळूण२९.९९
गुहागर६०.००
संगमेश्‍वर४८.४६
दापोली५६.८४
खेड३५.००
मंडणगड ६६.७०

कोट
बाजारात असलेली मागणी आणि मिळणारा चांगला दर यामुळे जिल्ह्यातील कलिंगड लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. येथील वातावरणही पोषक असून रोगांचाही मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होत नाही.
- विनोद हेगडे, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com