
नितीन मेहता यांना शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार’ प्रदान
३३ (टुडे पान २ साठी)
-Rat५p३३.jpg ः
२३M००७०८
मंडणगड ः महाविद्यालयात डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना नितीन मेहता.
-------------
नितीन मेहतांना शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
मंडणगड, ता. ५ ः येथील गोपीनाथ मुंडे महाविद्यालयातील लिपिक नितीन मेहता यांना अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्यावतीने शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार देण्यात आला. कल्याण येथील के. एम. आग्रवाल कॉलेज येथे आमदार अॅड. निरंजन डावखरे, रा. जा. बडे-अध्यक्ष महासंघ, डॉ. आर. बी. सिंग-अध्यक्ष अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ व माधव राऊळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मेहता यांचा प्राचार्य प्रा. डॉ. जाधव यांच्या हस्ते त्यांचा शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी मेहता म्हणाले, मला मिळालेल्या पुरस्कारामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा असावी लागते आणि ते मी सातत्याने करत आलो आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, अध्यक्षा संपदा पारकर, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह सतीश शेठ, प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.