भगवान बुद्ध जयंती साजरी

भगवान बुद्ध जयंती साजरी

३५ (टुडे पान २ किंवा ३ साठी)


-rat५p३५.jpg-
२३M००७१०
रत्नागिरी : सेवा सामाजिक विकास संस्थेत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी.
-----
सेवा सामाजिक विकास संस्थेत
भगवान बुद्ध जयंती साजरी

रत्नागिरी, ता. ५ : सेवा सामाजिक विकास संस्था, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५८५ व्या जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात तथागत प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलाने झाली. श्रीशरण पंचशील व बुध्द पुजापाठ घेण्यात आली. विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये प्रणय मोहिते, वेदांत मोहिते, विराज मोहिते यांनी गौतम बुध्द यांचा जन्म ते ज्ञानप्राप्तीपर्यंतचा कार्यकाल सांगितला. अंकिता जाधव हिने बुध्दानी दिलेल्या शांततेच्या मार्गाचा अवलंब कशाप्रकारे आपल्या जीवनात करावा व आपण आपल्या जीवनात शांततेने शिकून यश प्राप्त करण्याचे मार्ग मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी उमेश जोशी तसेच शिक्षिका पौर्णिमा कांबळे, प्रज्ञा सावंत, शिक्षक प्रशांत ठाकूर, ललित कांबळे उपस्थित होते.
श्री. जोशी यांनी तथागत बुध्द यांनी ज्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा सोडुन खरे सुख कशामध्ये आहे, हे पाहण्यासाठी ज्ञानप्राप्ती करून माहिती करून घेतली. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांने समाजसेवा करून आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन मानसी मोहिते हिने केले. श्रावणी आयरे हिने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com