संक्षिप्त

संक्षिप्त

आयसीएस महाविद्यालयात
चैतन्य वार्षिक अंकाचे प्रकाशन
खेड ः येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘चैतन्य’ हा वार्षिक अंक प्रकाशित करण्यात आला. संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना. बा. शेलार यांनी वार्षिक अंकातील लेख लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि हा अंक संपादित करणाऱ्या संपादन मंडळाचे अभिनंदन केले. यातील लेख हे नक्कीच प्रेरणादायी ठरतील, अत्यंत वाचनीय अशा प्रकारचा हा अंक सर्वांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला यांनी चैतन्य वार्षिक अंक खूपच उत्तम झाला असल्याचे नमूद केले.


पोलिस पाटील संघटनेकडून
खेड पोलिसांचे अभिनंदन
खेड ः तालुक्यातील लोटे व चिपळूण तालुक्यातील रिक्टोली इंदापूर येथील खुनाचा तपास येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी केला. याबद्दल खेड तालुका पोलिस पाटील संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले. लोटे येथे सुमारे २७ वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा मुख्य आरोपी सुरेशचंद्र राम खिलवान (वय ५०) याला खेड पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या पथकाने फतेहपूर उ. प्रदेश येथून ताब्यात घेतले. २००८ मध्ये बनावट मृत्यू दाखला मिळवला आणि मयत झाल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल केली; मात्र गडदे यांच्या नेतृत्वातील उपनिरीक्षक सुजित सोनावणे, राम नागुळकर, अजय कडू, वैभव ओहोळ, तुषार झेंड या तपास पथकाने आपले कौशल्य पणाला लावले आणि पोलिस खात्याला गौरवास्पद अशी कामगिरी केली. नुकतीच चिपळूण तालुक्यातील रिक्टोली इंदापूर येथील निर्मला शिंदे या ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा दागिन्यांसाठी खून करण्यात आला. शिरगाव अलोरे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नदिप साळोखे व खेड पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शिरगाव अलोरे पथकाने अवघ्या आठ दिवसात रिक्टोली धनगरवाडीजवळील जंगलात लपून बसलेल्या मुख्य आरोपी प्रशांत शिंदे याच्या मुसक्या आवळल्या याबाबत खेड तालुका पोलिस पाटील संघटनेकडून एकाच आठवड्यात दोन महत्वाच्या तपासकार्यात महत्वाची भूमिका असलेले खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुजित गडदे व पथकाचे अभिनंदन केले.

००७३१

पेंडखळेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा
राजापूर ः तालुक्यातील पेंडखळे गावाची ग्रामदेवता श्री जाकादेवी मंदिराचे जीर्णोद्वारानंतरचे नूतन वास्तूपूजन आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम १० ते १८ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (ता. १०) मे रोजी दुपारी ३ वा. ग्रामदेवींच्या नवीन मूर्ती भू येथे आणण्यात येतील. तेथून त्या दुपारी ३ वा. ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत, रथातून मिरवणुकीने श्री कुणकेश्वर मंदिरात आणण्यात येणार आहेत. नूतन वास्तूचे पूजन, मूर्तींची प्राणप्रतिष्ठा हे सर्व धार्मिक विधी १३ ते १५ मे या कालावधीत करण्यात येणार आहेत तसेच १८ मे रोजी नवचंङी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १५) मे रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत मंदिराच्या कळसाची स्थापना परमपूज्य श्री भाबळे महाराज, ओणी, (प. पू. श्री गगनगिरी महाराज यांचे शिष्य) यांच्या हस्ते होणार आहे तसेच रात्री ८ वा. श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, बुवा शामसुंदर आचरेकर (वय ८४) यांचे सुश्राव्य भजन आणि रात्री १० वा. साईश्रद्धा प्रतिष्ठान यांचे स्त्री पात्रानी नटलेले बहुरंगी नमन (पौराणिक गण, संगीताच्या सुरात सजलेली गौळण आणी वगनाट्य ‘ओढ तुझ्या पंढरीची’) असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री ग्रामदेवता, श्री जाकादेवी मंदिर समिती, पेंडखळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com