खेड ः खेडमध्ये 4 वाड्यांची टँकरसाठी धाव

खेड ः खेडमध्ये 4 वाड्यांची टँकरसाठी धाव

खेडमध्ये चार वाड्यांची टँकरसाठी धाव
खेड, ता. ५ ः वाढत्या उष्म्यामुळे तालुक्यात पाणीटंचाई उग्ररूप धारण करत आहे. सध्या १५ गावे ३९ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. आणखी ४ गावातील ४ वाड्यांनी टँकरसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. टँकरच्या प्रतिक्षेतील ४ गावे ७ वाड्यांमध्ये टँकर धावू लागल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात १२ गावे ३२ वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर धावत होता.
कशेडी-बोरटोक, बंगला थापेवाडी शिंदेवाडी, तुळशी बुद्रुक–खुर्द, कुबजई- धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी येथील ग्रामस्थ टँकरच्या प्रतिक्षेत होते. अखेर प्रशासनाने या ठिकाणीही टँकर सुरू केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तालुक्यात १५ गावे ३९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने आष्टी-धनगरवाडी, मोरवंडे- जाधववाडी, सुकिवली-सोनारवाडी, मांडवे-कोसमवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. या गाववाड्यांचे सर्वेक्षण करून या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे टंचाईग्रस्त गाववाड्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रशासनाकडे मात्र अवघा एकच टँकर उपलब्ध आहे. एका टँकरद्वारे तहानलेल्या गाववाड्यांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com