वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

sakal_logo
By

१० (पान ३ साठी)


- rat५p३२.jpg-
२३M००६९७
मृतावस्थेत आढळलेला बिबट्या.
----------
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

कोर्ले येथील घटना ः अपघातात पाठीला दुखापत

लांजा, ता. ५ ः तालुक्यातील कोर्ले येथील दाभोळ-वाटूळ रस्त्यावर वाहनाने दिलेल्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या पाठीच्या मणका मोडलेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वनविभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोर्ले-दाभोळ-वाटूळ रस्त्यावर ३ वर्ष वयाचा बिबट्या रस्ता अपघातामध्ये मृत झाला असल्याची माहिती पोलिस पाटील अल्ली अब्दुल साटविलकर यांनी दूरध्वनीवरून वनपाल दिलीप आरेकर यांना दिली. वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार आणि सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. कोर्ले येथे एका काजू बागेजवळ बिबट्या मृतावस्थेत पडलेला आढळला. वाहनाचा जोराचा धक्का लागल्यामुळे मागील पायांच्या मध्ये साधारणतः आठ इंच खोल जखम झालेली हाती. त्याचे शरीर डांबरी रस्त्यावर घासून गेल्यामुळे ती जखम झाली असावी, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीनंतर व्यक्त केली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रकाश सुतार करत आहेत.