कणकवली :अपघात जखमी

कणकवली :अपघात जखमी

००७९४
००७९५

भरधाव ट्रक उलटून चालक गंभीर
हळवल फाट्यावर घटना; महामार्ग प्राधिकरणाचा निष्काळीपणा
कणकवली, ता. ५ : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणावर ट्रक उलटला. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात आज दुपारी चारच्या सुमारास गडनदी पुलावरील हळवल फाट्यावर झाला. नसीम कल्लू शहा (वय ३०, रा. गुजरात ) असे जखमी चालकाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी आंदोलन, उपोषण करून महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारवेर धरल्यानंतर तात्काळ उपाय योजनेचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. महामार्ग प्राधिकरणच्या निष्काळजीपणा अपघाताने पुन्हा एकदा उघड झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुजरात येथील पेपर मिलमधून थर्माकोलची वाहतूक करणारा ट्रक (जीए ०५ टी ६५७८) महामार्गावरील कणकवली गडनदी पुलावर आला असता हळवल फाट्यावरील वळणावरील रस्त्यावरच उलटला. जवळपास ५० फूट सरकत गेला. यात चालक जागीच बेशुद्ध पडला. नागरिकांनी तसेच ऋषिकेश नारायण कोरडे (रा. कणकवली) यांनी जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षक अनिल जाधव, चालक श्री. उबाळे, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार श्री. मासाळ, होमगार्ड सुमित वारंग, मिलिंद मेस्त्री, नितीन म्हापणकर आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रकची पाहणी केल्यानंतर चालक एकाटाच असल्याचे निष्पन्न झाले. अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार रमेश पवार यांनी अपघातग्रस्त ट्रकची पाहणी केली. त्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी ही अपघातस्थळाला भेट दिली.
महामार्गाच्या चौपदरीकरणात बहुतांशी अपघातग्रस्त वळणे कमी करून रस्ता सरळ रेषेत केला आहे. मात्र, हळवल फाटा येथील धोकादायक वळण जैसे थे आहे. या वळणावरील होणाऱ्या अपघाता विरोधात सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर तत्कालीन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या दालनात १७ जानेवारीला महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी आश्वासन देऊन या वळणाच्या बाबत माहामार्ग सुरक्षा समितीकडून पाहणी करून योग्यत्या उपाय योजना केल्या जातील असे सांगितले होते. मात्र, मागील चार महीण्यात कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रक पलटी झाला. या स्थळवरील अपघात हे दिवसाच्या वेळतच होत आहेत. त्यामुळे हे वळण शास्त्रीदृष्टा चुकीच्या पध्दतीने तयार करण्यात आल्याचा नागरिकांनी केलेला आरोप आजच्या अपघाताने अधोरेखीत झाला आहे. याअपघातातची नोंद उशीरांने पोलिस केली जाणार आहे.

प्रताप दळवी बचावले
हळवल फाटा येथील चिकन व्यावसायिक प्रताप दळवी (रा. कळसुली, परबवाडी) हे बचावले आहे. भरधाव ट्रक रस्त्यावर उलटला तेव्हा ते स्टॅालबाहेर बसले होते. ट्रक उलटताच घसरत जाऊन स्टॅालमध्ये घुसला. दळवी यांचा चिकन विक्रीचा स्टॅाल आहे. तसेच ट्रकने ज्या स्टॅालला धडक दिली तो स्टॉल आज बंद होता. त्यामुळे अनर्थ टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com