आचरा गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

आचरा गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

आचरा गोळीबारप्रकरणी दोघांना अटक
९ मेपर्यंत पोलीस कोठडी; विविध कलमांखाली गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ५ : येथे झालेल्या गोळीबार व चाकू हल्लाप्रकरणी आचरा पोलीसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वापर करणे, शिवीगाळ, मारामारी करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरुन पिस्तूल, गोळ्या, चॉपर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून एकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान दोघांना न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आचरा - देवगड रोडवर रामेश्वर मंदिर फाट्याजवळ काल (ता. ४) सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी हल्ला झालेल्या गौरव पेडणेकर यांचा जबाब घेण्यात आला. याबाबत आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी झालेल्या गौरव पेडणेकर (रा. आचरा-वरचीवाडी) याने घटनेची फिर्याद आचरा पोलीसात दिली आहे.
दुपारी दोनच्या समारास काम उरकून गौरव आचरा तिठ्यावर गेला होता. तेथे त्याला गर्दी दिसली म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी जगदीश तुकाराम पांगे व तौकीर काझी तसेच डोंगरेवाडी येथील सचिन दुखंडे यांच्यामध्ये चिंगूळ प्रकल्पाच्या करणावरून वाद चालू होता. त्यावेळी गौरव याने ध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर गौरव व किशोर शिर्के सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लौकिक हॉलवरून गाडीने पारवाडी येथे जात होते. त्यावेळी दुपारच्या भांडणच्या रागातून तौकीर काझी, शुभम जुवाटकर यांने गाडीच्यासमोर दुचाकी आडवी घातली व त्यांना शिव्या घालत मारहाण केली. गौरववर चॉपरने हल्ला केला. तसेच जुवाटकर याने रिव्हाल्वर रोखून गोळी झाडली. त्याचा नेम चुकल्याने गोळी लागली नाही.
घटनेनंतर आचरा पोलिसांनी प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी करून पंचयादी करून हल्ल्यात वापरलेले दुचाकी वाहन तसेच फायरिंग केलेले रिव्हाल्वर, रिव्हाल्वरच्या गोळ्या तसेच हल्ल्यात वापरलेला चॉपर आचरा पोलिसांनी जप्त केला आहे. गोळीबार व चाकू हल्ल्याप्रकरणी आचरा पोलिसांनी शुभम जुवाटकर (रा. दांडी-मालवण), तौकिर काझी (आचरा काझीवाडा), प्रतीक हडकर (रा. चिंदर सडेवाडी) या तिघांविरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. हडकर व काझी या दोन संशयितांना अटक करण्यात आली.
दरम्यान, हल्लाप्रकरणातील मुख्य सूत्रधार शुभम जुवाटकर याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटकेची कारवाई करण्यात आली नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर जुवाटकर याला अटक करणार असल्याची माहिती आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
मालवण न्यायालयाने तीनही संशयितांना ९ मेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार भणगे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com