Fri, Sept 22, 2023

ट्रॅक्टर लंपासप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
ट्रॅक्टर लंपासप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Published on : 5 May 2023, 3:17 am
ट्रॅक्टर लंपासप्रकरणी
एकावर गुन्हा दाखल
सावंतवाडी, ता. ५ः आरटीओने जप्त केलेला ट्रॅक्टर सावंतवाडी बस स्थानक जवळ ठेवला होता. हा ट्रॅक्टर अक्षय चव्हाण (रा. सोलापूर) याने लंपास केला. याप्रकरणी सावंतवाडी पोलीसात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून अक्षय चव्हाण याला अटक करून सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर सावंतवाडी तालुक्यातील असून हा ट्रॅक्टर आरटीओने जप्त केला होता. अक्षय तो याने लंपास केला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस महेश जाधव व धनंजय कदम करीत आहेत.