पुरवणी लेख- 16- मंगलकार्य साजरे करताना नको असुरीवृत्तीचा अडथळा A66399

पुरवणी लेख- 16- मंगलकार्य साजरे करताना नको असुरीवृत्तीचा अडथळा A66399

ratvardha१६.txt

फोटो -

१) ratvardha३४ ःKOP२३M००९५६ राजापूर ः रायपाटणची ग्रामदेवता श्री वडचाई.
२) ratvardha३५ ःKOP२३M००९५७ होळीच्या ठिकाणी केलेला होम.
३) ratvardha३६ ःKOP२३M००९५८ होळीला बांधलेला नारळ काढण्यासाठी लोकांमध्ये लागलेली चढाओढ.
४) ratvardha३७ ः KOP२३M००९५९ श्री वडचाई देवीचे नूतन मंदिर.
५) ratvardha३८ ः २३M००९६० राजापूर ः होळी उभी करताना भाविक, ग्रामस्थ.

इंट्रो
---
रायपाटणच्या होळी उत्सवाची सुरवात होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी स्वयंभूच्या होळ्या म्हणून जुना चव्हाटा रवळनाथ, भावकादेवी, एकविरा देवी, विठ्ठलमंदिर, वडचाई मंदिर या ठिकाणी चार-पाच फुटाच्या आंब्याच्या फांदीच्या होळ्या घातल्या जातात. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला सायंकाळी सूरमाडाची होळी तोडून ओढत मांडावर आणली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील सुतारमंडळी होळीचे नेम (खंदक) खोदतात. सायंकाळी सुमारे ४ नंतर होळी उभी करण्यासाठी गावातील बाळगोपाळ ग्रामस्थ जमा होतात. होळीला आंब्याच्या डहाळीचे लोन बांधून टोकाला पिवळ्या रंगाच्या ध्वज लावला जातो. होळी उभी करण्यासाठी लाकडी शिड्या तयार केल्या जातात. हे काम पूर्वापार काही तज्ञमंडळी सेवाभावी वृत्तीने पार पाडत असतात. होळी उभी करण्यासाठी शिड्या लावून गावकर मंडळी आणि काही तज्ञमंडळी आवाज दिल्यानुसार एका सुराने दमाने हय्....हय्...करून ताकद लावून होळी उभी केली जाते.
रूढीपरंपरेप्रमाणे मानकरी कुळकर्णी यांच्याकडून ढोल वाजवून गवत आणले जाते व ते होळीभोवती पसरवले जाते. होळीच्या सात-आठ फुटावर एक छोटे कोंबडे बांधले जाते. त्यानंतर मानकरी मंडळी गवत पेटवतात. त्याचवेळी बांबूने ते कोंबडे होळीच्या मांडाच्या हद्दीच्या बाहेर फेकून दिले जाते. यामागचा बारकाईने हेतू लक्षात घेता समाजामध्ये एक विघ्नसंतोषी वर्ग असतो. त्याची संख्या जरी अल्प असली तरी कोणत्याही शुभ कार्य व मंगल कार्यालयामध्ये विधायक कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो. पुढील मंगलकार्य साजरे करताना असुरीवृत्तीचा अडथळा येऊ नये म्हणून त्याचा भाग कोंबडे म्हणून दिला जातो.

- विलास कृष्णा गांगण
सचिव, श्री वडचाई मंदिर न्यास (मो. ९२२६१७८७२७)

मंगलकार्य साजरे करताना नको असुरीवृत्तीचा अडथळा

उत्सवाच्या आरंभानंतरचे मंगलकार्य म्हणजे होळीला बांधलेला नारळ काढणे. होळीला २५ ते ३० फुटावर एक नारळ बांधला जातो. त्यानंतर होळीच्या भोवती पसरलेल्या गवताला आग लावली की, आग लागली म्हणून बोंबा मारायच्या. त्यानंतर पाणी ओतून आग विझवली जाते. यामध्ये मौजेचा भाग म्हणजे ढोल वाजवून गवत आणावयाचेही आणि आपण होळीभोवती पसरावयचे. आपण आग लावायची. आपण आग लागली म्हणून बोंबाबोंब करायचीही आपण आणि पाणी ओतून आग विझवण्याचेही श्रेय घ्यायचेही आपण.
आग विझवल्यानंतर गुरव-पुजारी चव्हाट्याची पूजा करतात. त्यानंतर, गावातील बाळगोपाळ ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ व पाहुणे मंडळी बर्‍याचे-वार्षिक रखवालीचे नारळ ठेवतात. गावकार मंडळी प्रत्येकाच्या नावाचे गार्‍हाणे घालतात. होळीला वर बांधलेला नारळ काढण्याची स्पर्धा सुरू होते. पूर्वी चव्हाट्यावर शेट्ये मानकरी व गुरव असे दोघेजण चव्हाट्यावर पाय देऊन उभे राहत असत व एक पक्ष त्याला सहकार्य करत असे. ही तयारी म्हणजे वर जाऊन नारळ काढणार्‍याला वर जाऊ न देता त्याचे पाय धरून प्रतिकार करणे, हा भाग आहे. कालांतराने यामध्ये बदल होऊन सध्या एका पक्षाच्या (वर्गाच्या) खांद्यावर ३ शेट्ये मानकरी उभे राहून नारळ काढण्यासाठी वर जाणार्‍याला प्रतिकार करण्यासाठी सज्ज होतात. त्यांनी इशारा केल्यानंतर दुसरा पक्ष (वर्ग) एकमेकांच्या खांद्यावरून वर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रतिकार केला जातो. असे असले तरी त्यातून एखादा चपळपणे वर जाऊन नारळ काढतो. नारळ काढल्याशिवाय हा खेळ पूर्ण होत नाही. याला उभे रोमट म्हटले जाते. यातील ज्ञानाचा भाग लक्षात घेता वर बांधलेला नारळ हे सत्याच्या सूर्याचे प्रतीक असून सत्यापर्यंत जाण्यासाठी एक पक्ष (वर्ग) प्रयत्नशील असतो; मात्र, दुसरा पक्ष त्याला सत्यापर्यंत जाऊ देत नाही. नारळ काढलाच गेला नाही किंवा भविष्यात तसे होणारच नाही जसे की, उगवणार्‍या सूर्याला म्हणजे सत्याला कोणी रोखू शकत नाही, हेच यामागचे सत्य दिसून येते.
यातील पहिला भाग म्हणजे प्रथम चव्हाट्याची पूजा करून, नमस्कार करून नारळ काढणे, शुभमंगल कार्य करण्यासाठी त्या कालमर्यादेपुरते आसुरी प्रवृत्तीला आपल्या ताब्यात ठेवणे, हा भाग दिसून येतो. विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे ज्या मुळ महापुरुषांनी या खेळाची रचना करून आकार घातला ते महापुरुष विद्वानांच्या यादीतील असावेत. वरील नारळ काढल्यानंतर तो नारळ मानकरी मंडळी हातात धरून नारळ काढण्याची-सोडवण्याची स्पर्धा सुरू होते. त्यामध्ये मानकरी बाजूला होऊन मग इतर जणांमध्ये स्पर्धा सुरू असते. गटागटाने काढण्याचे प्रयत्न होतात. त्यातून कोणत्यातरी गटातून नारळ काढून चव्हाट्यासमोर फोडला जातो. ज्याने नारळ काढला त्याला खांद्यावर घेऊन जयजयकार केला जातो. या कार्यक्रमाला आडवे रोमट असे म्हणून संबोधले जाते. रायपाटण गावचा होळीचा मांड हा ओणी अणुस्कुरा मुख्य रस्त्यालगत असल्याने मोठी गर्दी असते. रोमटाचा कार्यक्रम झाला की, सर्व भक्तांना नारळ प्रसाद दिला जातो. या सर्व खेळांच्या क्रमाचा बारकाईने विचार केल्यास त्यामध्ये फार मोठा ज्ञानाचा भाग दिसून येईल.
दुसर्‍या दिवशी पालखी श्रृंगारली जाते. ही सेवा पूर्वापार रूढी-परंपरेप्रमाणे सुतारमंडळी करत होती आणि आहेत. तसे पाहता पूर्वी पालखी नव्हती तेव्हा घरोघरी देवाचे निशाण फिरवले जात असे. सेवा चर्मकार समाजातील पवार घराणे करत होते व आजही अनवाणी करत आहे. सुमारे नव्वद-शंभर वर्षापूर्वी हौसेखातर सुतारमंडळींनी स्वखर्चाने लाकडी पालखी फार मोठ्या कलाकौशल्याने बनवली तेव्हापासून पालखीबरोबर निशाणासह ढोलवाद्यासह घरोघरी भेटीसाठी जाते. भाविक श्रद्धापूर्वक वार्षिक ओटी, हातभेट ओटी, नवस ओटी, नवस बोलणे इत्यादी भाग असतो. पालखीसोबत तमाशासह गोमूचा नाच असतो. प्रथम रोडे मानकरी टिपरी खेळ नंतर शेट्ये मानकरी घुमट वाद्य सादर करतात.
पालखी श्रृंगारल्यानंतर मंदिराच्या बाहेर गांगण व शेट्ये मानकरी भाई बनून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून नंतर गावातील संगनाथेश्‍वर, रवळनाथ व मोतादेवी मंदिरांना भेट देऊन होळीच्या मांडावर सानेवर येऊन रात्री स्थानापन्न होते. रात्रीचा जागर प्रत्येक वाडीवार केला जातो. दुसर्‍या दिवशी शेट्ये मानकरी घुमट व रोडे मानकरी टिपरी खेळाचं सादरीकरण करून नंतर मानकऱ्यांघरी भेट देऊन गांगणवाडीपासून गावातील सर्व वाड्यांना भेटी दिल्या जातात. यामध्ये त्या दिवशी वाडी पूर्ण करून सायंकाळी पालखी सानेवर येऊन स्थानापन्न होते. सानेवर आजूबाजूच्या गावातील भाविक-पाहुणे मंडळी श्रद्धापूर्वक येऊन ओट्या भरतात. पालखीमध्ये श्री वडचाई, श्री रवळनाथ, श्री संगनाथेश्‍वर, श्री एकविरा देवी व श्री मोनेश्‍वर असे पाच देवतांचे मुखवटे लावून स्थापना केली जाते.
पालखीच्या घरोघरी भेटी देऊन झाल्या की, शेवटचा शिंपणे कार्यक्रम होतो. तो दिवस गुढीपाडव्याच्या पूर्वी येणारा रविवार-बुधवार व शुक्रवार यापैकी एक दिवशी शिंपणे कार्यक्रम पार पडतो. हे तीन वार ठेवण्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या घरी वडे-मटणाचे जेवण असते. जेवणासाठी पाहुणे मंडळींना निमंत्रित केले जाते. शिंपण्याच्या सकाळी जुन्या चव्हाट्यापासून धुळवडीने सुरवात होते. सायंकाळी पहिल्या दिवसाप्रमाणे बर्‍याचे नारळ ठेवून झाले की, उभे रोमट-आडवे रोमट हा खेळ होतो. नंतर देवावर शिंपणे घातले जाते. रात्री स्वर्गीय मानकरी नाना गोविंदे शेटे यांचे घरातून ढोलताशे वाद्यासह गुलालाची उधळण करत मांडावर धुमधडाक्यात येते. यामध्ये बालगोपाळ मोठ्या उत्साहाने ढोल वाजवणे, नाचणे याचा आनंद घेत मांडावर येतात. त्या वेळी शेट्ये यांचे घरातून घुमट खेळ निघून मांडावर येतो. त्याचवेळी पालखी भेटीसह रोमट मांडावर जाते. यामध्ये चव्हाट्याला रूप लावण्याची सेवा श्री नमसे-तळेकर-राणे इत्यादी पूर्वापार रूढी-परंपरेप्रमाणे सेवा करत असतात. यामध्ये विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे संपूर्ण १५ दिवसाच्या खेळामध्ये आपापली जबाबदारी सेवाभावी वृत्तीने पार पाडत असतात. यामध्ये कोणी कुणाला सांगावे लागत नाहीत.
पूर्वापार रात्रीच्या घोरीप या खेळाची सुरवात शेट्ये-निखार्गे मंडळी घुमट खेळाने करतात. त्यानंतर दिवट्या पाजळणे कार्यक्रम होतो. पुन्हा रामायण-महाभारत आधारित पौराणिक कथेद्वारे गायनाचा कार्यक्रम होतो. त्याला साथ तमाशाची असते. नंतर प्रथम सोंग गांगण वंशाकडून गणपतीचे आणले जाते नंतर रात्रभर सुमारे तेवीस-चोवीस सोंगे रातभर आणली जातात. यामध्ये पडद्यामागचे कलाकार म्हणून सोंगे सजवण्याचे काम राणे, नमसे, तळेकरस शिंदे इत्यादी मंडळी करत असते. खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या विज्ञानयुगात अनेक कला प्रगत झाल्या आहेत; मात्र, गेल्या पन्नास-साठ वर्षापूर्वी खेडोपाडी ग्रामीण कलेतूनच ज्ञान आणि समाज प्रबोधन केले जात असे. त्यानुसार ती कला आजही त्याप्रमाणे सादर केली जाते. सकाळी सांगता समारंभाच्या अंतिम टप्पा म्हणून दिवट्या पाजळण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर पालखी वाजतगाजत मंदिरामध्ये आणून पालखीतील दैवतांची रूपे उतरवली जातात. संपूर्ण गावाला नारळाच्या प्रसादाचा वाटप केल्यानंतर लोक घरोघरी जातात. त्यानंतर मुखवटे उजवणे हा दिवस ठरवला जातो. त्या दिवशी संपूर्ण गावात यथेच्छ महाप्रसाद दिला जातो.
बदलत्या काळानुसार श्री वडचाई मंदिराचा न्यास सन २००२ मध्ये झाला असून, पाच मानकरी, तीन सेवेकरी, तेरा वाडीवार विश्‍वस्त एकूण २१ विश्‍वस्त अशी रचना असून, या माध्यमातून श्री वडचाई मंदिराचे देखणे असे मंदिर उभारून गावाच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com