कामगार नोंदणी-नूतनीकरणात अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार नोंदणी-नूतनीकरणात अडचणी
कामगार नोंदणी-नूतनीकरणात अडचणी

कामगार नोंदणी-नूतनीकरणात अडचणी

sakal_logo
By

00968
ओरोस ः उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तनपुरे यांना निवेदन देताना बाबल नांदोसकर. शेजारी रवींद्र साळकर आदी.

कामगार नोंदणी-नूतनीकरणात अडचणी

संघटनेने वेधले लक्ष; उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ, ता. ६ ः बांधकाम कामगारांना नोंदणी-नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक दाखल्याबाबत व शासकीय लाभ मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हाअध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईमार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना संबंधित मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी जीवित ठेवण्यासाठी दरवर्षी किमान ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडे सादर करून नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गातील बहुतांश कामगार हे नाका कामगार प्रवर्गातील असल्यामुळे अशा बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे; परंतु काही ग्रामसेवक अधिकाऱ्यांकडून कामगारांना अनावश्यक कागदपात्रांची पूर्तता करण्याची नियमावली देण्यात येत आहे. यात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व बांधकाम सुरू असल्याचा परवाना आदी अनावश्यक कागदपत्रांची यादी आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कामगारांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे कामगारांचे नोंदणी नूतनीकरण झाले नसल्याने त्यांना योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या मंडळाकडून ठरवून दिलेल्या दाखल्याच्या स्वरुपात असलेला ठेकेदार-घरमालक यांचा उल्लेख असलेल्यांकडे चौकशी करून दाखला देण्यात येऊ शकतो. तसे केल्याने कामगारांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. याबाबत लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. बांधकाम कामगार नोंदणीत अडचणी निर्माण होण्यासाठी या जाचक अटी गावपातळीवर निर्माण केल्या जात असल्याचा आरोपही यात केला आहे. यावेळी सचिव रवींद्र साळकर, दीपक गावडे, अनिल कदम, नीता गावकर आदी उपस्थित होते.