
ः शिंपण्याच्या खुणा इतिहासजमा
१३ ( पान ६ )
(३० एप्रिल पान सहा)
आख्यायिकांचे आख्यान ः लोगो
rat६p१.jpg
२३M००८८९
ः इतिहासजमा होत असलेली कमान.
rat६p४.jpg -
२३M००९४०
जे. डी. पराडकर
संगमेश्वरवासीयांची रंगपंचमी ही फाल्गुन अमावस्येच्या जवळपास बलिदानास योग्य दिवस पाहून साजरी केली जाते. लाल रंगाची मनसोक्त उधळण आणि वडेमटणाचा बेत म्हणजेच अनोखी रंगपंचमी अर्थात ‘शिंपणे’ देवी जाखमाता आणि देवी निनावी यांचा ‘खेळ’असतो. या उत्सवाला जुनी परंपरा आहे. संगमेश्वरसोबतच हा उत्सव कसबा, माखजन आणि देवरूख येथेही एकाच दिवशी साजरा केला जातो. संगमेश्वरचे जाखमाता मंदिर मुंबई-गोवा महामार्गालगत आहे. तेथे लागूनच मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी एक पुरातन कमान आहे. या कमानीतून मंदिर परिसरात प्रवेश करतांना ‘जुने बंदर’ अशी कमानीवर कोरलेली अक्षरे पाहून नव्या पिढीला अथवा पर्यटकांना काहीसे आश्चर्यच वाटत असेल. संगमेश्वर हे प्राचीन काळी मोठ्या लगबगीचे बंदर होते. वयोवृद्ध मंडळी आजही बंदरावर जाऊन येतो हां, असे सांगून घरातून बाहेर पडतात. बंदराच्या अन्य कोणत्याही खुणा आज अस्तित्वात नसल्या तरी जाखमाता मंदिर येथील कमानीवर असणारी जुने बंदर ही अक्षरे संगमेश्वरच्या इतिहासातील गतवैभवाची साक्ष आहे.
---
शिंपण्याच्या खुणा इतिहासजमा
शिंपणे उत्सवात लाल रंग अंगावर घेणे, हा सर्व भक्तांचा मुख्य उद्देश असतो. लाल रंगात न्हाऊन निघताना वयाचे बंधन नसते. येथे लाल रंग स्त्री-पुरुष समानतेच्या मुल्याचे प्रतीक ठरतो. संगमेश्वरच्या शिंपणे उत्सवात लाल रंगात न्हाऊन निघालेला भक्त पुढे चार दिवस ओळखणेदेखील कठीण जाते. जसा लाल रंग महत्वाचा तसेच पाण्यात बाळगोपाळांनी दिवसभर डुंबणेदेखील तितकेच महत्वाचे. यासाठी उत्सवाआधीपासून जाखमाता मंदिरालगत असणाऱ्या हौदात पाणी साठवले जायचे. प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी मुले दिवसभर पाणी साठवलेल्या या हौदात स्वतःला विसरून भिजण्याचा अनोखा आनंद लुटत असत. असा आनंद अन्यवेळी मुलांच्या चेहऱ्यावर पाहायलाही मिळत नाही. पूर्वी बांबूच्या पिचकाऱ्या तयार करून या हौदातील पाणी डुंबणारी मुले, एकमेकांवर आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांवर मारून उत्सवाची खरी मज्जा लुटत. बदलत्या काळात बांबूच्या पिचकाऱ्या इतिहासजमा झाल्या आणि त्यांची जागा प्लास्टिकच्या चिनी पिचकाऱ्यांनी घेतली. आता तर बांबूच्या पिचकाऱ्यांबरोबर शिंपण्याचा पाणी साठवण्याचा हौदही चौपदरीकरणात इतिहासजमा झाला आहे.
शिंपण्याचा हौद म्हणजे साठवलेल्या पाण्यात दिवसभर मस्त भिजायचे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शिंपणे उत्सवाच्या दिवशी मुले या हौदात पोहण्याचा आनंद लुटतात. सायंकाळी सातनंतर हे पाणी शांत होते. रात्री दहाच्या दरम्यान पाण्याचा हा हौद फोडून सर्व पाणी सोडून दिले जाते आणि शिंपणे उत्सवाची सांगता होते. कसबा येथेही असाच पाण्याचा हौद आहे. त्याला ग्रामीण भाषेतील नांव ‘लेंडी’ असे आहे. कसबा आणि संगमेश्वर येथील शिंपणे उत्सवाच्या प्रथा परंपरा जवळपास सारख्याच आहेत. आता चौपदरीकरणात संगमेश्वर येथील शिंपणे उत्सवाचा हा हौद आणि मंदिराजवळ असणारी कमान दृष्टीआड झाली आहे. रात्री मुख्य प्रसाद वाटपाप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, मलकापूर, मुंबई आणि पुणे येथील असंख्य भक्तगणांची उत्सवाचा प्रसाद मिळावा म्हणून मोठी गर्दी होते. चौपदरीकरणानंतर सारी व्यवस्थाच बदलण्याची वेळ येणार आहे.
चौपदरीकरण करताना संगमेश्वरच्या जवळपास असणाऱ्या काही ऐतिहासिक बाबी दृष्टीआड होणार आहेत. संगमेश्वरच्या असंख्य पिढ्यांचे इतिहासातील या पाऊलखुणांजवळ घनिष्ट असे नाते निर्माण झालेले असल्याने पुढील पिढीला या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी कळाव्यात. जाखमाता मंदिरापुढे असणारी कमान म्हणजे हा परिसर जुने बंदर असल्याची साक्ष देत होती. या कमानीवर जुन्या काळी जुने बंदर अक्षी अक्षरे कोरलेली पाहायला मिळत. खरंतर, प्रवेशद्वाराची ही कमान म्हणजे जाखमाता मंदिराची शान होती. चौपदरीकरण करताना प्रथम येथील शिंपणे उत्सवाचा हौद गेला नंतर शेकडो वर्षे मंदिर परिसरासह महामार्गाला शीतल छाया देणारा महाकाय पिंपळ वृक्ष तोडण्यात आला आणि त्याच्या पाठोपाठ मंदिराजवळची कमानही तोडण्यात आली. छोट्या मुलांना आता शिंपणे उत्सवादरम्यान, हौदात साठवलेल्या पाण्यात डुंबणे हे काळाच्या पडद्याआड गेले आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)