सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांचे झाले दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांचे झाले दर्शन
सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांचे झाले दर्शन

सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांचे झाले दर्शन

sakal_logo
By

६ (पान ६ साठी)

- rat६p३.jpg-
२३M००९३९
रत्नागिरी ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे दुर्बिणीतून आकाशदर्शन करताना खगोलप्रेमी महिला पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित विद्यार्थ्यांसह प्रा. बाबासाहेब सुतार, जितेंद्र विचारे आदी.

सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांचे झाले दर्शन

तारांगणात आकाश दर्शन ः खगोल अभ्यासक प्रा. सुतारांचे मार्गदर्शन

रत्नागिरी, ता. ६ ः येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणात छायाकल्प चंद्रग्रहणाचे औचित्य साधत रत्नागिरीकरांसाठी आकाशदर्शन कार्यक्रम आयोजित केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांनी ढगाआडून दिलेले दर्शन बालदोस्ताना चांगलेच भावले. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत तीनशेहून अधिक रत्नागिरीकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

तारांगणात पालिकेच्या नियोजनाप्रमाणे विविध उपक्रम व थ्रीडी शो तिथे नियमित चालू झाले आहेत. तारांगणाचे अधिकारी जितेंद्र विचारे, मार्गदर्शक अभिजित शेट्ये यांनी खगोल अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार यांना आकाशदर्शन कार्यक्रम घेण्याची विनंती केली. त्यानुसार ५ मे ची छायाकल्प चंद्रग्रहणाची संधी साधत आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला. स्वयंसेवक सम्यक हातखंबकर आणि अक्षय साळवी यांनी यासाठी मदत केली.
तारांगण परिसरात सूर्य मावळतीला असतानाच उत्साही नागरिकांनी शिस्तबद्ध उपस्थिती लावली. पाच वर्षापासून ७५ पर्यंतचे आबालवृद्ध गोळा झाले. चंद्र, शुक्राला काळ्या ढगांनी झाकून टाकले; पण नंतर हळुहळू ढग दूर झाले. सप्तर्षी, स्वाती, चित्रा, मघा यांनी ढगाआडून अधूनमधून दर्शन दिले. चंद्र आणि शुक्र दर्शनासाठी दुर्बिणीजवळ मोठ्या रांगा झाल्या. शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी आकाशदर्शनाचा लाभ घेतला. कोकणात सुट्टीवर आलेली मंडळी, विशेषतः लहान पाहुणे यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला होता. हौशी खगोलप्रेमी उपेंद्र बापट यांनी गेले दोन आठवडे कॅमेऱ्यात पकडलेल्या विविध चंद्रकलांचं दर्शन नोटबुकवर दाखवताच मंडळींना कौतुक वाटले. जितेंद्र विचारे यांनी आगामी नवीन शो आणि नवीन उपक्रम याचीही माहिती गटागटांना दिली.

---
कोट

लहान खगोलप्रेमींनी आणि नव्याने प्रथमच आलेल्या मंडळींनी दाखवलेल्या उत्साहाने आम्हाला अधिकच बळ येतं. तारांगणाच्या समोरच्या प्रांगणातच दुर्बिणी लावल्या होत्या. त्यामुळे सहज डोकावून जाणारी मंडळीही प्रथमच येऊन गेली. सुमारे ३ तास हा कार्यक्रम उत्साहात झाला. बुद्ध पौर्णिमेला रत्नागिरीचे तारांगण हसले.

- प्रा. बाबासाहेब सुतार.