नांदगाव येथे आज देव कोळंबा जत्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगाव येथे आज
देव कोळंबा जत्रोत्सव
नांदगाव येथे आज देव कोळंबा जत्रोत्सव

नांदगाव येथे आज देव कोळंबा जत्रोत्सव

sakal_logo
By

00972
श्री देव कोळंबा मंदिर
00973
फुलांनी सजलेले पाषाण

नांदगाव येथे आज
देव कोळंबा जत्रोत्सव
नांदगाव, ता. ६ ः मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव उद्या (ता. ७) होणार आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते.
‘कोळंब्याचा चाळा’ म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असणारा आणि विशेष करून मुक्या प्राण्यांचा रक्षणकर्ता म्हणून कोळंबा देवाची सर्वदूर ख्याती आहे. श्री देव कोळंबाचा नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबड्या, बकरीचा बळी देण्याची व मटण भाकरीच्या प्रसादासाठीची जत्रा म्हणून याची ओळख आहे. गेली दोन वर्षे कोरानाच्या संकटामुळे साधेपणाने झालेला हा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. येथे हजारो वर्षांपासून श्रीदेव महादेवाचे निराकाररुपी लिंग गर्द अशा झाडीत होते. याच लिंगरुपी पाषाणाला स्थानिक ग्रामस्थ ‘श्री देव कोळंबा’, या नावाने गावाचा रक्षणकर्ता म्हणून पूजाअर्चा करतात. ‘‘आपल्या घराचे-गावाचे रक्षण कर, सांभाळ कर’’, असे म्हणून श्रद्धेने देवाच्या चाळ्याला कोंबडा व देवाला श्रीफळ अर्पण करतात. याच्या श्रद्धेची प्रचिती आल्याने आज लाखाहून अधिक श्री देव कोळंबाचे भक्त आहेत. पूर्वी जत्रेला शे-दीडशे भाविक दर्शनास येत. त्यांची संख्या आता लाखाच्या घरात पोचली असून प्रत्येक भक्ताला अनुभूती मिळत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे आणि सायंकाळी चारनंतर महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.