रामशास्त्री व झाशीची राणी पुस्तके भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामशास्त्री व झाशीची राणी पुस्तके भेट
रामशास्त्री व झाशीची राणी पुस्तके भेट

रामशास्त्री व झाशीची राणी पुस्तके भेट

sakal_logo
By

५ (पान ६ साठी)

- rat६p२.jpg-
23M00995
तंजावर ः तंजावरचे राजे बाबाजी भोसले यांना रामशास्त्री व झाशीची राणी पुस्तके भेट देताना रत्नागिरीचे लेखक अॅड. विलास पाटणे.

ॲड. पाटणेंकडून राजे बाबाजी भोसलेंना
रामशास्त्री, झाशीची राणी पुस्तके भेट

रत्नागिरी ः व्यंकोजीराजे यांचे वारस बाबाजीराजे भोसले यांची रत्नागिरीतील लेखक व ज्येष्ठ वकील ॲड. विलास पाटणे यांनी भेट घेतली. मराठीसाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल राजे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना स्वतः लिहिलेल्या न्या. रामशास्त्री व झांशीची राणी ही पुस्तके भेट दिली. ‘सरस्वती महाल’ ही ‘पब्लिक लायब्ररी’ असून आजही तेथे ६० हजारांहून अधिक मराठी, संस्कृत आणि अन्य भाषांतली दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत. राजे प्रतापसिंह यांनी तंजावरवर पुस्तक लिहिले आहे. तंजावरमध्ये एक लाख लोक मराठी बोलतात. मराठीचा झेंडा फडकवत ठेवणारे, कर्नाटक संगीताचा व मराठी नाटकाचा पाया घालणारे तंजावरविषयी साऱ्या मराठी माणसाला आदर व कौतुक आहे, असे अॅड. पाटणे म्हणाले.