विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा

विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा

७ (पान ५ साठी)

Rat६p१२.jpg ः
२३M००९५१
तुळशी ः सेवापूर्तीनिमित्त शिक्षक सुनील भेकत यांचा सपत्नीक सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी.

शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा

सुनील भेकत यांचा सत्कार ; तुळशी हायस्कूलच्या जडणघडणीत योगदान

मंडणगड, ता. ६ ः शाळेत विद्यार्थीप्रिय म्हणून शिक्षक अशी ओळख निर्माण करणारे आणि न्यू इंग्लिश स्कूल तुळशीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे शिक्षक सुनील भेकत यांच्या सेवापूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नुकताच हा कौटुंबिक सोहळा पार पडला. भेकत यांनी शैक्षणिक क्षेत्रात एकूण २६ वर्षे सेवा बजावली. यामध्ये मंडणगड, गुहागर तालुक्यात ते कार्यरत राहिले. सेवेपैकी अठरा वर्षे त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल तुळशी शाळेत आपली सेवा दिली. मितभाषी असणारे भेकत हे कायम विद्यार्थ्यांमध्ये रमलेले पाहायला मिळत असे. या वेळी शाळेचे लिपिक कर्मचारी कैलास धाडवे यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. शिक्षक शिवाजी सोनवणे यांनी त्यांचे व्यक्तिमत्व उलगडताना त्यांची बलस्थाने सांगून विद्यार्थी आणि त्यांचे नाते यावर भाष्य केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, सदस्य सुवर्णा धाडवे, सचिन माळी, शिक्षक शिवाजी सोनवणे, टी. खंदारे, लिपिक कैलास धाडवे, कर्मचारी संदेश पारधी व विद्यार्थी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com