गोधनाचे संगोपन ही काळाची गरज

गोधनाचे संगोपन ही काळाची गरज

00997
वायंगणी ः गोशाळा भूमिपूजनप्रसंगी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक व अन्य.


गोधनाचे संगोपन ही काळाची गरज

श्रीपाद नाईक; वायंगणीत गोशाळेचा भूमिपूजन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ ः ‘हिंदू धर्मामध्ये गाईला देव मानले जाते. या गाईंचे पालन, पूजन आणि संगोपन करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने सुरू होत असलेली ही विजया नाईक स्मृती गोशाळा हा ट्रस्टचा उपक्रम समाजाला प्रेरणा देणार आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी वेंगुर्ले पाटील चेंबर्स येथील कार्यक्रमात बोलताना केले.
तालुक्यातील वायंगणी येथे होणाऱ्या विजया नाईक स्मृती गोशाळेचे भूमिपूजन आज केंद्रीयमंत्री नाईक यांच्या हस्ते केले. यावेळी पं. वसंतराव गाडगीळ, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे डॉ. राजेंद्र खेडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडकर, प्रसाद खंडागळे, सदानंद आगलावे, वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, तसेच बाबली वायंगणकर, शरद चव्हाण, साईप्रसाद नाईक, जी. जी. साळगावकर, भगवान महाराज कोकरे, मनीषा खेडेकर, गौरी कामत-कणसे, किरण राऊत आदी उपस्थित होते.
वायंगणी येथे श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे उभारण्यात येणाऱ्या या गोशाळेचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते केले. भूमीचे पूजन करून या ठिकाणी असलेल्या गायीचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते केले. डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आभार मानले. दरम्यान, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचा १५ वा वर्धापन दिन वेंगुर्ले येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, कीर्तन, जल्लोष महिलांचा व म्युझिकल मेलडी, तसेच श्री सद्‌गुरू आरोग्य सेवा व निसर्गोपचार केंद्राचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमांनी आज दिवसभर साजरा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com