राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना
कुडाळकर हायस्कूलमध्ये वंदन

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कुडाळकर हायस्कूलमध्ये वंदन

01036
मालवण ः कुडाळकर हायस्कूल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना
कुडाळकर हायस्कूलमध्ये वंदन
मालवण : येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षपूर्तता सोहळा साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. जनसामान्यांसाठी राजर्षींनी केलेल्या प्रेरणादायी लोकाभिमुख कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अजय शिंदे, श्री. आठलेकर, सौ. कांबळे, श्री. नाईक यांनी मनोगतातून शाहू महाराजांच्या विचारकार्याला नव्याने उजाळा दिला. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची परब, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानंतर प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा निकाल जाहीर करून मुलांना निकालपत्रके देण्यात आली.
..................
एमएचटी-सीईटी परीक्षा ९ पासून
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यामध्ये एमएचटी-सीईटी परीक्षा ९ ते २१ मे २०२३ पर्यंत घेण्यात येणार आहे. (१५ मे २०२३ हा एक दिवस वगळून) सकाळी ७.३० ते सायं ६.४५ या वेळेत एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ बु. या केंद्रावर दोन सत्रात या परीक्षा घेण्यात येणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी ही माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com