आचऱ्यात आज संयुक्त जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचऱ्यात आज संयुक्त जयंती
आचऱ्यात आज संयुक्त जयंती

आचऱ्यात आज संयुक्त जयंती

sakal_logo
By

आचऱ्यात आज संयुक्त जयंती
आचरा : आचरा-बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. ७) भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. यात सकाळी नऊला ध्वजवंदन व पूजापाठ, दुपारी तीनला सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्‍घाटन, चारला जाहीर सभा होईल. सभेचे अध्यक्ष विद्याधर आचरेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सचिव रवींद्र पवार उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहाला स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.