दुर्गसान्निध्याने संपन्न खेड

दुर्गसान्निध्याने संपन्न खेड

सिद्धेश परशेट्येः बिग स्टोरी

इंट्रो

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसमवेत केलेल्या स्वराज्यनिर्मितीला खरी साथ मिळाली ती दुर्गवैभवांची. यापैकी तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड, महिमंडणगड हे सह्याद्रीच्या डोंगरांगात आजही अभिमानाने उभे आहेत. महारांजाच्या स्वराज्य निर्मितीचे साक्षीदार असलेले हे किल्ले शासनाच्या उदासीन धोरणामुळे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. हे किल्ले आणि किल्ल्यावर असलेल्या इतिहासकालीन साधनसामुग्रींचे जतन करण्यासाठी काही संस्था पुढाकार घेत आहेत; परंतु त्यांना पाठबळ कमी पडते. या किल्ल्याच्या पायथ्याशी जाणारे रस्ते नाहीत वा सध्या अपूर्णावस्थेतच आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी सुमारे ५ कोटी रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. महिपतगडवर राज्य प्रशासनाने १ रुपयादेखील खर्ची टाकलेला नाही. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्वच आगामी काळात नष्ट होण्याची भिती दुर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. सद्यःस्थितीत केवळ ट्रेकर्ससाठी हा किल्ला उपयुक्त असल्याचे म्हटले जाते.
- सिद्धेश परशेट्ये
------------------------------

दुर्गसान्निध्याने संपन्न खेड
रसाळगडसाठी ५ कोटी ; उर्वरित गडांची उपेक्षा, इतिहासाविषयी अनास्था

rat७p३.jpg
01064
महिमंडणगड किल्ला
rat७p४.jpg
01065
गडावरील कोरीव पाण्याचे टाके.

महिमंडणगड इतिहासाच्या पानांवरून नष्ट होतोय

सह्याद्रीचा ताशीव कातळ कोरून तयार केलेले दुर्ग छत्रपतींनी गनिमांना रोखण्यासाठीच निर्मिती केली होती. त्यातील काही किल्ले लढाऊ किल्ले तर काहींचा छावण्या (ठाणे) अथवा चौक्या म्हणून वापर केला जात होता. खेड तालुक्याचा अंतर्भाव असलेला व सातारा जिल्ह्यातील जावळी खोर्‍यातील सातवाहनकालीन किल्ला म्हणून महिमंडणगडचे नाव घ्यावे लागते. खेडपासून ३४ किमी अंतरावर शिंदी गाव किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. रघुवीर घाटमार्गे शिंदी-खिंड चौकीपासून या किल्ल्याकडे कच्च्या रस्त्याने सुमारे दीड किमी कच्चे रस्त्याचे अंतर कापून जावे लागते. उजवीकडे वर जाणारी एक पाऊलवाट थेट महिमंडणगडावर घेऊन जाते. चौकीपासून साधारण ४५ मिनिटात थेट गडमाथा गाठता येतो. कोयना धरणाच्या जलाशयामुळे तिथे जाण्यासाठी खेडमधूनच जावे लागते. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाक्यानंतर चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव-खोपी फाटामार्गे या किल्ल्यावर पोहचण्याकरिता जावे लागते. शिंदी गावातून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर जोडशीखरांच्या खिंडीत पोहोचल्यानंतर वाटेत काही ठिकाणी कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या अस्पष्ट खुणा नजरेस पडतात. पाऊलवाटेने दक्षिण बाजूने एक वळसा मारून माथ्यावर पोहोचता येते. एका खिंडीच्या उजव्या बाजूला महिमंडणगड आहे. खिंडीपाशी महिमंडणगडचा ताशीव कडा कोकणात कोसळताना दिसतो तर दुसरीकडे दूर वासोटा, नागेश्वरचा सुळका आणि झाडीतले डोंगर दिसतात. खिंडीच्या दक्षिण बाजूने एक वळसा मारल्यावर गडाचा माथा लागतो.
गडाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले असून, प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे बिनछप्पराचे देऊळ दिसून येते. त्याच्या समोरच बुरूजावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍या दिसतात. येथून थोडे पुढे समोरच पाण्याचे सुंदर तलाव आहेत. या तलावाला बारामही पाणी असून, त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष आढळून येतात. येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. गडाच्या ईशान्येस गडाची एक सोंड लांबवर गेलेली दृष्टिपथास येते. या सोंडेला पकडून एक डोंगररांग पुढे गेलेली आहे. या सोंडेवर थोडेफार वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला असणारी तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. किल्ल्याकडे जाणारी मळलेली पायवाट सुस्थितीत केली गेल्यास या किल्ल्यावर पोहोचता येणे शक्य होणार आहे. किल्ल्यावर श्री भैरवनाथाचे मंदिरदेखील आपले अस्तित्व राखून आहे. तिथे शिवपिंडी पूजणारी पार्वतीची शिल्पेदेखील आढळून येतात.

------------------------------
दृष्टिक्षेपात महिमंडणगड...

या प्रकारातील किल्ल्याची चढाई करणे सोपे
गडावर एक पडके मंदिर आहे
जवळच पाण्याच्या टाक्या आहेत
एका टाकीवर कोरीव शिल्प आहे
देवीचं रेखीव मूर्तिकाम पाहावयास मिळते
चावंड, अवचितगड, अलंगवरील टाक्यांशी साधर्म्य
किल्ल्यावरून मकरंदगड, वासोटा किल्ले दिसतात
-----------------------------

rat७p५.jpg
01066
रसाळगड किल्ला
rat७p६.jpg
01067
झोलाई-वाघजाई मंदिर
rat७p७.jpg ः
01068
तोफ

तोफांचा किल्ला अशी रसाळगडची ओळख

महाराष्ट्रातील ३५४ किल्ल्यांपैकी खेड तालुक्यामध्ये ४ किल्ल्यांचा समावेश होतो. त्यातील किल्ले रसाळगड’ हा दुर्ग राज्यशासनाने संरक्षित स्मारक घोषित करून शासकीय निधीदेखील उपलब्ध केला आहे. या किल्ल्यांची दुरुस्तींची व्यथा आजमितीला कायमच आहे. तोफांचा किल्ला असा उल्लेख ज्या किल्ल्याचा केला जातो तो किल्ला म्हणजे रसाळगड. पर्वतरांगेवर रसाळगड किल्ला इतिहासाचा साक्षीदार म्हणून आजही गौरवगाथा सांगत आहे. गडाचा घेरा ५ ते ७ एकरमध्ये वसलेला आहे. १९६०च्या मोहिमेत शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला. पुढे १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड ताब्यात घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंकडून सर्व किल्ले घेतले; मात्र रसाळगड राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असल्याचे सांगण्यात येते. या किल्ल्याची उभारणी १४व्या शतकात म्हणजेच शिलाहार काळात झाली आहे. किल्ल्यावरून मावळ्यांना रसद पुरवण्यासाठी त्याची उभारणी करण्यात आली. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवर व कोरीव कातळावर असलेल्या रसाळगड किल्ल्यावर ३८ तोफा होत्या; मात्र सद्यःस्थितीत चारच तोफा आढळून येतात. या किल्ल्यावर जावळीचे मोरे, छत्रपती शिवराय, राणी ताराबाई, तानाजी आंग्रे, पेशवे व इंग्रज यांनी सत्ता गाजवलेली आहे.

चौकट
‘या’ वास्तू रसाळगडावर अद्यापही शाबूत
------------------
४ बुरूज चोरवाटा
स्वयंपाकगृह
विश्रांतीगृह, राजवाडा
बालेकिल्ला, प्रवेशद्वार
घोड्यांच्या पागा
गणपती मंदिर, हनुमानमंदिर
झोलाई-वाघजाई मंदिर
पाण्याचा तलाव, धान्य कोठार
ज्ञात-अज्ञातांच्या समाध्या
विविध देवदेवतांच्या मूर्ती
---------------------------
चौकट
भ्रष्टाचारामध्ये आणखीनच रूतला
राज्य स्मारक घोषित केल्यानंतर दुर्गचे सुशोभीकरण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी आला होता. शिवप्रेमी, गडकोट संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सारख्यांनी या किल्ल्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्याकरिता जनरेटा लावला. रसाळगड किल्ल्यावर अनेक कामे शासनाच्या पुरातत्त्व विागाने हाती घेतली आहेत. किल्ल्यावर पर्यटकांसाठी कोणतीही सुव्यवस्था उपलब्ध नसल्याने या दुर्गाला भेट देणाऱ्या पर्यटक, शिवप्रेमी यांचा पुरता हिरमोडच होतो.
---------------
rat७p८.jpg
1069
महिपतगड
rat७p९.jpg ः
01070
खेड दरवाजा
rat७p१०.jpg ः
अजिंक्य टोक
rat७p११.jpg ः
01073
विविध मूर्ती
rat७p१२.jpg ः
01074
श्री पारेश्वर मंदिर


सह्याद्रीच्या कोंदणातील महिपतगड दुर्लक्षितच

राकट सह्याद्रीची पर्वतरांग...चढणीचा व तितकाच निबीड जंगलातून जाणारा थकवणारा रस्ता किंबहुना मळलेली पायवाटच...अन् निसर्गाच्या सान्निध्यात ३ हजार ९९४ फूट उंचीवर सह्याद्रीच्या कोंदणात विसावा घेत असलेला महिपतगड हा तालुक्यातील सर्वाधिक उंचीवरील किल्ला. येथे आढळून येणारे अवशेष आजही इतिहासाची गौरवगाथा सांगत आहेत. तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड या पर्वतरांगेतील महिपतगड सहजासहजी दृष्टिपथात येत नाही. उत्तर दिशेला १२० एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. याच परिसरात महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेकदेखील प्रसिद्ध आहे. सर्वाधिक उंची हेच या किल्ल्याचे बलस्थान. शिवाजी महाराज यांनी कर्नाटकपर्यंतच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. या मोहिमांवरून स्वराज्याची राजधानी रायगड येथे परतण्याचा लांब पल्ला पार करताना मावळ्यांची दमछाक होत असे. त्यांच्यासाठी एखादे विश्रांतीस्थान असावे, या उद्देशाने महाराजांनी महिपतगडाची उभारणी केली; परंतु त्याच्या इतिहासाबद्दल आजही फार कमी माहिती आहे. ईशान्य बाजूस लाल देवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्‍चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा आणि ईशान्येस यशवंत दरवाजा आहे. या दरवाजांच्या केवळ पाऊलखुणा उरल्या आहेत. शिवगंगा दरवाजाजवळ शिवाची पिंड, पुसाटी दरवाजाजवळ एक शिडी, कोतवाल दरवाजाजवळ मारूती मंदिर तर पारेश्वर या देवतेचे स्वयंभू मंदिर आहे. त्या मंदिरासमोरच शिवकालिन विहिरदेखील आहे. गडावरील भवानीमातेच्या मंदिराजवळ गड उभारताना गूळ व चुना यांच्या मिश्रणासाठी उभारलेल्या पट्टांचे अवशेष आजही दिसून येतात. गडावर पाण्याच्या ७ टाक्या आढळतात. गडावर तीन तोफा असून, दोन तोफा लहान तर एक ६ फूट लांबीची दिसून येते. किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असलेले अजिंक्य टोक तसेच लाल देवडी दरवाजा या ठिकाणाहून प्रतापगड, महाबळेश्वर, किल्ले रायगडचे दर्शन घडते.

------------------
अशी आहे महिपतगडाची रचना

उंचीवर असलेला किल्ला ही ओळख
किल्ल्याचा परिसर ४ किमी पसरलेला
गड वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणी आकाराचा
गडाच्या चारही बाजूंनी तुटलेले कडे
या गडाला एकूण ६ दरवाजे आहेत.
किल्ल्यावर भूयार दगड, मातीने होरले
-----------------------------
चौकट
इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होण्याच्या मार्गावर
किल्ल्याकडे जाणारा रस्तादेखील धड नसल्याने वाहनचालकांना मात्र चांगलीच कसरत करावी लागते. पायथ्याशी वसलेल्या छोटेखानी गावातूनच मळलेल्या पायवाटेने या किल्ल्यावर पोहोचता येते; परंतु गेली अनेक वर्ष या किल्ल्याकडे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांचा ओघ वाढलेला आहे. किल्ल्यावर बाजारपेठ, अनेक देवतांची मंदिरे, छत्रपतींचा पडका राजवाडा, नष्ट झालेले दरवाजे, समाधीस्थळे यांसारख्या अनेक इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होण्याच्या मार्गावर या ऐतिहासिक दुर्गावरील या पाऊलखुणां. त्यावर गर्द जंगलात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास गडप झाला आहे.

----------

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला सुमारगड

तालुक्याच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सुमारगड आहे. या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे ३ एकर जागेत विस्तारलेले आहे. पूर्वी या किल्ल्याभोवती १५ ते २२ फूट उंच तटबंदी होती, असे उल्लेख १८६२च्या नागरी किल्ल्याच्या इतिहासात आहेत. आजही या तटबंदीचे अवशेष शिल्लक आहेत. या किल्ल्यावर चारही बाजूंना तोफा आहेत. किल्ल्याच्या बांधकामासाठी काळ्या दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. एका उंच पर्वत शिखरावर हा किल्ला बांधलेला असल्यामुळे किल्ल्यावर चढून जाण्यास अत्यंत कठीण आणि अवघड वाट आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंना नैसर्गिक तटबंदी आहे. पर्वतकडा सरळसोट कापलेला आहे. त्यामुळे किल्ल्यात अन्य मार्गाने प्रवेश करणे तसे अवघडच. किल्ल्यात १६ निकामी तोफा आहेत. उंच भागात तलाव आहेत. पश्चिमेस घोड्याची पाग आहे. किल्ल्यापासून मागेपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्यावर भैरी आणि शिवाचे अशी दोन मंदिरे असून, किल्ल्याच्या उंचवट्यावरून वाघ नदी, मांडवे गाव, वाडी जैतापूर, देवघर, नांदिवली या गावांचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडते.

----------
कोट
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुजी करण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः लक्ष घातले आहे. रसाळगड, सुमारगड या किल्ल्यांवर दुरुस्तीसह पर्यटनाच्यादृष्टीने देखील लवकरच पावले उचलण्यात येतील.
rat७p१७.jpg ः
01075
- योगेश कदम, आमदार
-------------

कोट
पुरातत्त्व खात्याचे नियम आणि पुरातन वास्तूच्या डागडुजीसंदर्भातील कायद्याची चौकट बदलणे आवश्यक आहे. भावी पिढीला या वास्तूसंदर्भात माहिती द्यावयाची असेल तर या वास्तूचे संवर्धन महत्वाचे आहे.
rat७p१८.jpg

- प्रशांत खातू, जिल्हाप्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
---------------

कोट
गडकिल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा आहे. त्यांचे जतन करताना इतिहास आणि निसर्ग या दोन्हीही बाजू विचारात घेऊन योजना अंमलात आणल्या पाहिजे. गडकिल्ले बांधताना राजांचा जाणतेपणा ठायी ठायी नजरेत भरतो. किल्ला अतिशय दुर्गम जागी बांधतानाच तिथे पाणी आणि इतर नैसर्गिक साधनांची कामतरता जाणवणार नाही याचा महाराजांनी विचार केल्याचे दिसून येते. पर्यटन सुविधा पुरवताना काही ठिकाणी अशा नैसर्गिक संसाधनांची हानी होत असल्याचे दिसून येते त्याचबरोबर पर्यटकांची हौसमौज पुरवताना इतिहासाकडे देखील दुर्लक्ष होते.

rat७p१९.jpg

- डॉ. चंद्रशेखर सांळुखे
------------

कोट

१९९६ ला रायगड प्रदक्षिणा केली त्या वेळी १३ वर्षांचा होतो. सर्वात लहान प्रदक्षिणावीर म्हणून गौरव झाला होता. आतासुद्धा गडकिल्ले धुंडाळण्यासाठी मी जातो त्या वेळी गडकिल्ल्यांची झालेली दुरवस्था पाहून मन विषण्ण होते. या गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी शासनस्तरावर पावले उचलणे आवश्यक आहे.

rat७p२०.jpg - सिद्धार्थ देसाई, दुर्गप्रेमी - खेड
-----------

कोट
गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी सद्यःस्थितीत आम्ही सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहोत. आम्ही नुकतीच पालगड येथे लोकवर्गणीतून तोफांना गाडे बसवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत रसाळगडावरील तोफांना गाडे बसवण्यात येणार आहेत. खेडसह आजूबाजूच्या गडावरील स्वच्छतादेखील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येणार आहे.

rat७p२१.jpg -

वैभव सागवेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com