
भूषण मुळ्ये यांचे स्वागत
१३ (टुडे पान ३ साठी)
rat७p२.jpg-
२३M०११६७
रत्नागिरी ः जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन (२ ड) अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांचे अभिनंदन करताना रवींद्र इनामदार व प्रभाकर सनगरे.
विज्ञान शिक्षक मंडळातर्फे सीए मुळ्ये यांचे स्वागत
रत्नागिरी ः जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन (२ ड) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सीए भूषण मुळ्ये यांचे अभिनंदन रत्नागिरी जिल्हा विज्ञानशिक्षक मंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी केले. या प्रसंगी मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे, सीए अभिलाषा मुळ्ये आणि कर्मचारी उपस्थित होते. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. सीए भूषण मुळ्ये हे अनेक वर्षांपासून या ग्रुपमध्ये कार्यरत असून, येत्या वर्षभरात नवनवीन उपक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. यापूर्वी मुळ्ये यांनी सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्षपदही उत्कृष्टपणे भूषवले आहे.
--------------
स्वा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी ः पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन येत्या २१ ते २८ मे २०२३ दरम्यान केले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवारी (ता. २२) मे रोजी सकाळी ११ वा. ऐतिहासिक पतितपावन मंदिरात केले आहे. स्पर्धा खुल्या गटासाठी होणार आहे. स्वा. सावरकर यांच्या जीवन प्रसंगावर रांगोळी काढायची आहे. यामध्ये प्रथम क्र. ५ हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रू. ३००० व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक २०००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. १००० सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. २२ मे २०२३ वेळ: सकाळी ११.०० वाजता स्पर्धेला सुरवात होईल.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ, रांगोळीसाठी जागा स्पर्धेवेळी सांगण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे देण्याची अंतिम तारीख १८ मे पर्यंत राहिल. स्पर्धकांनी आपली नावे संपर्क कमिटीकडे वेळेत द्यावीत. बक्षीस वितरण समारंभ २८ मे रोजी सकाळी ११.०० वा. पतितपावन मंदिर, रत्नागिरी या ठिकाणी होईल. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी अनघा निकम - मगदूम आणि मंगेश मोभारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---
rat७p१६.jpg-
२३M०११६६
रत्नागिरी : बैलगाडी शर्यत स्पर्धेचे राज्यस्तरीय विजेते सुरेश भोसले यांचा सत्कार करताना विनायक हातखंबकर. सोबत प्रताप सावतंदेसाई, सुधाकर सावंत, सरपंच स्नेहा नागले आदी.
बैलगाडी शर्यत स्पर्धा विजेते
सुरेश भोसले यांचा सत्कार
रत्नागिरी : तरुण उत्साही मित्रमंडळ (मुंबई) आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ (चरवेली मराठवाडी) यांच्या विद्यमाने बैलगाडी शर्यत स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेते सुरेश भोसले (दिव्या-रणवीर या बैलजोडीचे मालक) यांचा हृद्य सत्कार नुकताच झाला. याप्रसंगी विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानित करण्यात आले. हनुमान मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रताप सावंतदेसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी नेते सुधाकर सावंत, शिक्षक नेते विनायक हातखंबकर, संस्कृती फाउंडेशनचे राजेश गोसावी, सरपंच स्नेहा नागले, उपसरपंच काशिनाथ कदम, फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नेत्रा राजेशिर्के, मराठा मंडळाच्या अध्यक्ष प्रणाली शितोळे, मंडळाचे दीपक पवार, मुंबई अध्यक्ष एकनाथ कदम, गावकर दीपक नागले, आदी उपस्थित होते. कोरोना योद्धा ज्यांनी चरवेली पंचक्रोशीच्या ग्रामस्थांची सेवा केली असे डॉ. सुजय लेले यांचा तसेच प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी, कर्तबगार, ज्येष्ठ नागरिक, कर्तुत्ववान महिला, वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या व्यक्ती यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दिवशी सत्यनारायण पूजा, भजने, रात्री बहुरंगी नमन असे कार्यक्रम आयोजित केले होते. सूत्रसंचालन मुंबई मंडळाचे प्रमोद पवार यांनी केले.
-