खेडमध्ये एसटीच्या टपावर साप

खेडमध्ये एसटीच्या टपावर साप

खेडमध्ये एसटीच्या टपावर साप
खेडः खेड एसटी स्थानकात एसटी बसच्या टपावर एका साप आढळून आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. खेड बस स्थानकामध्ये खेड ते किल्ले माची या लोकल एस्टी बसच्या टपावर भलामोठा साप दिसला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. गजबजलेल्या खेड बसस्थानकात हा प्रकार घडला. हरण टोळ म्हणजेच टाळूफोड्या जातीचा हा विषारी हिरव्या रंगाचा साप थेट एसटी बसच्या टपावर निदर्शनास आल्याने एसटी बसमधील सर्व प्रवाशांनी ‘साप आला.. साप आला, अशी आरडाओरड करत स्थानकातील नियंत्रण कक्षात धाव घेतली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले व त्या विषारी सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुट्ट्या असल्याने बसस्थानकात आणि सर्व एसटी बसमध्ये मोठी गर्दी आहे. त्यात एसटीच्या टपावर साप पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागात घनदाट झाडीमध्ये कदाचित झाडावरून एसटीच्या टपावर हा विषारी साप पडला असावा, असा अंदाज आहे.
----------
वाहतूक बंदने एसटी प्रवाशांचे हाल
चिपळूणः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी हा घाट दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवला जात आहे. यामुळे वाहनचालकांचे मात्र मोठे हाल होत आहेत. एसटीच्या गाड्या परशुराम घाटापाशी आणून उभ्या केल्या जात आहेत. घाटातील वाहतूक सुरू झाल्यानंतर या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे चार ते पाच तासांहून अधिक काळ प्रवाशांची रखडपट्टी होत असून कडक उन्हात हाल होत आहेत. महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने व्हावे यासाठी ठेकेदार कंपनीने केलेल्या मागणीनुसार व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवली जात आहे. हलकी वाहने चिरणी-लोटे या पर्यायी मार्गाने सोडली जात आहेत.
------------
दापोली अर्बनमध्ये दहा उमेदवार रिंगणात
दापोलीः संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या व टेबल बँकिंगमुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या दापोली अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती; मात्र या निवडणुकीत दापोली तालुका कार्यक्षेत्रातील सर्वसाधारण मतदार संघातून निवडून दिलेले प्रतिनिधी गटातील ९ उमेदवारांच्या निवडीसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते; मात्र त्यातील ३ अर्ज अवैध ठरले होते. अवैध उमेदवारी अर्ज ठरलेले उमेदवार चंद्रशेखर जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाला सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्या अपिलावर सुनावणी घेण्यात आली व जोशी यांचे अपील मंजूर करण्यात आले असून, आता या प्रतिनिधी गटाची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com