विलवडे माऊली पंचायतनचा
उद्यापासून कलशारोहण सोहळा

विलवडे माऊली पंचायतनचा उद्यापासून कलशारोहण सोहळा

विलवडे माऊली पंचायतनचा
उद्यापासून कलशारोहण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ७ ः विलवडेचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवता पुन: प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला मंगळवारपासून (ता.९) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी सातला यजमानांची शरीर शुद्धी, सौर आर्याश्चत देवता प्रार्थना, स्वस्तीवाचन, संभारदान, पुण्याहवाचन, ब्राह्मण चरण, स्थळ शुद्धी, जलाधिवास दुपारी मंडप प्रतिष्ठा, गणेशयाग, विराम आदी धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद (माऊली कलाक्रिडा मंडळ मळावाडी पुरस्कृत). बुधवारी (ता.१०) सकाळी देवता स्थान विधी त्यानंतर दहाला मंदिर शिखर कलश प्रतिष्ठा, देवता अधिवास, देवता स्थापन, अग्निस्थापना, ग्रहयाग, वास्तूयाग दुपारी यतार्थ होम, तत्व होम आदी धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद (फौजदारवाडी मित्रमंडळ पुरस्कृत). गुरुवारी (ता.११) सकाळी स्थलशुद्धी, देवता पूजन त्यानंतर पावणेआठला श्री माऊली पंचायतन मूर्ती स्थापना, दुपारी बलिदान, पूर्णाहुती, महानैवैद्य, महाआरती, महागाऱ्हाणे, ब्राह्मण संभावना, तीर्थप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद (चव्हाटावाडी मित्रमंडळ आणि तांदळी सांस्कृतिक सेवा मंडळ मुंबई पुरस्कृत). रात्री नऊला आजगावकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी श्री देवी महापूजा, त्यानंतर दहाला श्री सत्यनारायण महापूजा, अकराला कुंकूमार्जन, दुपारी आरती नैवेद्य महाप्रसाद (टेंबवाडी मित्रमंडळ पुरस्कृत), सायंकाळी सातला हणखणे भजन मंडळाचे सुश्राव्य भजन, रात्री नऊला विलवडे बाळ गोपाळ नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे. कुंकूमार्जन करणाऱ्या महिलांनी ओटी आणायची आहे. या धार्मिक सोहळ्याला भक्त भाविकांसह माहेरवाशिणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी तसेच देवस्थानचे सर्व मानकरी आणि विलवडे ग्रामस्थांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com