घावनळे-खोचरेवाडी शाळेसाठी प्रयत्नशील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घावनळे-खोचरेवाडी शाळेसाठी प्रयत्नशील
घावनळे-खोचरेवाडी शाळेसाठी प्रयत्नशील

घावनळे-खोचरेवाडी शाळेसाठी प्रयत्नशील

sakal_logo
By

01199
घावनळे ः खोचरेवाडी शाळेचा सुवर्ण महोत्सवात आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

घावनळे-खोचरेवाडी शाळेसाठी प्रयत्न

आमदार नाईक; सुवर्ण महोत्सव उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः घावनळे प्राथमिक शाळेच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण झाली असून अनेकांनी या शाळेसाठी योगदान दिले आहे. या शाळेत माध्यमातून ५० वर्षांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडले आहेत. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता देखील अव्वल आहे. शाळेचे ऋण फेडण्यासाठी पुढील काळात प्रत्येकाने शाळेसाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. शाळेच्या शैक्षणिक गरजांबरोबरच भौगोलिक गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून शाळेसाठी सर्वोतपरी सहकार्य केले जाईल, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घावनळे-खोचरेवाडी शाळेचा सुवर्ण महोत्सव सोहळा नुकाताच झाला. याचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाईक यांनी भूषविले होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, दिनेश वारंग, पप्पू म्हाडेश्वर, लवू म्हाडेश्वर, दाजी धुरी, सुनील खोचरे, वासू खोचरे, उत्तरा पिळणकर, हरिशचंद्र खोचरे, दीपक सावंत, सोनिया मुंज, नंदू म्हाडेश्वर, सद्गुरू घावनळकर, श्रीधर खोचरे, श्री. पाटील, अनुप्रिती खोचरे, अॅड. सीमा बोभाटे, नाना राणे, धर्मा सावंत आदींसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी घावनळे ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.