कुडाळ नगरपंचायतर्फे मोफत संगणक प्रशिक्षण

कुडाळ नगरपंचायतर्फे मोफत संगणक प्रशिक्षण

कुडाळ नगरपंचायतर्फे मोफत संगणक प्रशिक्षण
कुडाळ ः येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील पाच टक्के (दुर्बल घटक) म्हणून अनुसूचित जाती व जमाती विमुक्त व भटक्या जमातीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी नगरपंचायतीच्यावतीने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नगपंचायतमधून प्रशिक्षण मागणी अर्ज घेऊन ४ ते ११ मे पर्यंत (सुटीचे दिवस वगळून) नगरपंचायत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अशी ः बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवासी दाखला व दोन फोटो.
---
माजगाव येथे आज कार्यक्रम
सावंतवाडी ः माजगाव येथील श्री महादेव मंदिरात उद्या (ता.८) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक आदी कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद (शंकर लक्ष्मण सावंत, माजगाव-खोतवाडा पुरस्कृत) होणार आहे. यानिमित्त माजगाव महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शंकर सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत यांनी केले आहे.
--------------
पाडलोस रवळनाथचा १० रोजी वर्धापन
सावंतवाडी ः पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता.१०) सकाळी सातला देवतांना स्नान, अभिषेक, विधीवत पूजापाठ, सकाळी साडेदहाला श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी पाचला स्थानिकांची भजने, रात्री नऊला दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘भेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
---
‘आयुर्वेद’मध्ये आज रेडक्रॉस दिन
सावंतवाडी ः इंडियन रेडक्रॉस सोसायटी सिंधुदुर्ग यांच्यावतीने जागतिक रेडक्रॉस दिन उद्या (ता.८) सकाळी ११ वाजता सावंतवाडीतील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय औषध विभाग येथे आयोजित केला आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. दीपक तुपकर यांनी केले आहे.
---------------
आता ‘शासन आपल्या दारी’
कणकवली ः शासनाने ‘जत्रा शासकीय योजनांची’ हे सर्वसामान्यांच्या विकासाचे अभियान १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र, शासनाने आता या योजनेच्या नावात बदल केला आहे. ही योजना यापुढे ‘शासन आपल्या दारी’ या नावाने ओळखण्यात येणार आहे.
---------------
सोनुर्ली येथे उद्या नाटक
सावंतवाडी ः श्री देवी माऊली कला क्रीडा सेवा मंडळ, दळवीवाडी व बांगडेवाडी यांच्यावतीने बांगडेवाडी सोनुर्ली येथे मंगळवारी (ता.९) रात्री आठला पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्लेचा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com