ज्ञानदीपच रौप्यमहोत्सवी वर्ष

ज्ञानदीपच रौप्यमहोत्सवी वर्ष

८ ( पान ५ संक्षिप्त)


- rat७p२५.jpg-
२३M०११७९
मोरवंडे : येथील ज्ञानदीप महाविद्यालयात प्रकाश गुजराथी यांचे स्वागत करताना संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी.

अभिमत विद्यापीठ म्हणून ज्ञानदीपची ओळख

खेड : ज्ञानदीप परिवार यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करत असून ज्ञानदीप मध्ये सध्या सुरु असलेल्या फार्मसी, आर्कटिक्चर तसेच हॉटेल मॅनेजमेन्ट प्रमाणे विधी महाविद्यालयही प्रस्तावित आहे. भविष्यात ज्ञानदीप हे या सगळ्या महाविद्यालयांना जोडणारे एक अभिमत विद्यापीठ म्हणून समोर येत असून कोकणातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे व्यासपीठ ज्ञानदीप परिवार निर्माण करत आहे, याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल, असा विश्वास संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांनी व्यक्त केला. ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरज येथे वार्षिक पदवीदान समारंभ नुकताच पार पडला, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी बोलत होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये विज्ञान व वाणिज्य विभागात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी होते. त्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा यांच्याहस्ते अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. कोकणातून सनदी अधिकारी निर्माण व्हावेत व कोकणातील शैक्षणिक , सामाजिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

--------

फोटो
- rat७p३५.jpg - खेड : राष्ट्रीय लाठीस्पर्धेत पदक मिळवणाऱ्यांचा सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.

राष्ट्रीय लाठी स्पर्धेत
खेडच्या दोघांना सुवर्णपदक

खेड : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लाठी फिरविण्याच्या स्पर्धेत स्पर्धेत खेड तालुक्यातील चाकाळे गावातील दोघानी सुवर्ण पदक मिळवले आहे. ही स्पर्धा नुकतीच दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडीयम मध्ये झाली.वैष्णव शिंदे याने द्वे लाठी प्रकारात सुवर्णपदक,काठ पविञा प्रकारात रौप्यपदक व पंच आणिकाह प्रकारात कास्य पदक मिळवले. तसेच मंथन शिंदे याने एकम लाठी प्रकारात सुवर्णपदक व द्वे लाठी प्रकारात रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेत एकूण एकवीस राज्यांमधील १४८० खेळाडू सहभागी झाले होते. खेड मधील शिंदे कुटुंबीयांनी दिल्ली ऑलिंपिक सिरीज १चे चॅम्पियन ट्रॉफी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राला मिळवून दिली. पाच पदके मिळवणाऱ्या या कुटुंबाचे चाकाळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे व शिंदे उपस्थित होत्या.
---------


- rat७p२७.jpg
२३M०११८८
ओळी: खेड: तालुक्यातील शिव येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना मान्यवर.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती सांगता समारंभ

खेड : नवमहाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ शिव बु. संचालित नवजीवन हाय शिव बु.येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती सांगता समारंभ नुकताच झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे कर्मचारी महेंद्र धोत्रे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक व प्रशालेचे माजी विद्यार्थी संभाजी लवंडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. इयत्ता सहावीतील विद्यार्थी तनुज लवंडे व शमिका लवंडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापक इसहाक मणेर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतला.शालेय कर्मचारी विमल वारांगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

------

rat७p३६.jpg -
२३M०११९७

खेड : येथील समर्थ कृपा इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित उन्हाळी शिबिर समारोपप्रसंगी प्रमाणपत्र प्रदान करताना मान्यवर.


श्री समर्थ कृपा विद्यालयात उन्हाळी शिबिर

खेड : समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वेरळ येथे नुकतेच उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिराचे ३ ते ६ व ७ ते १२ वर्षे असे दोन गटात विभाजन करण्यात आले. हे शिबिर २ ते ६ मे २०२३ या कालावधीत घेण्यात आले. या शिबिरामध्ये कलाशिक्षक पाटील यांनी पपेट शोद्वारे विद्यार्थ्याचे मनोरंजन केले व बाहुली नाट्यातून आनंददायी शिक्षणाचे प्रात्यक्षिकाद्वारे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षिका रसिका पालांडे यांनी योगा व मल्लखांब याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. कला शिक्षिका जोशी व मनवे यांनी चित्रकला व हस्तकलांचे प्रात्यक्षिक दाखविले. कलाशिक्षण, चिकणमातीपासून फळे व शोभेच्या वस्तू तयार करणे, डान्स योगा, स्टोन पेंटिंग इत्यादीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्याना नैसर्गिक सहलीचा अनुभव देण्यात आला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वीरेंद्र चिखले, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिचघरीचे कलाशिक्षक तुकाराम पाटील, अब्दुल सतार अली मणियार, रोहन विचारे, दिग्विजय इंदुलकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय शेटवे आदी उपस्थित होते. शिबिरात ७९ विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय शेटवे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले.
-----

ज्ञानदीप मध्ये उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण वर्ग

खेड : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गाला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांच्या हस्ते झाले. मौजे भडगाव व मौजे मोरवंडे - बोरज या दोन्ही विद्यासंकुलात झालेल्या शिबिरात १२० खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्याना बॉक्सिंग संदर्भातील कौशल्य शिकवण्यात आली. रोज दोन तास मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण वर्गासाठी बॉक्सिंग या खेळातील राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षक तसेच ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल मोरवंडे- बोरजचे क्रिडा शिक्षक आशिष कुमार देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणासाठी भडगाव प्रशालेचे क्रिडा शिक्षक संतोष भोसले व मोरवंडे - बोरज कॅम्पस मधील क्रिडा शिक्षक मुकूल सोमण आणि विनायक सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले .

------

- rat७p३८.jpg -
२३M०१२३४
गावतळे ःगुणगौरव सोहळा प्रसंगी मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव.

कोळबांद्रे नंबर १ शाळेत गुणगौरव

गावतळे ः जिल्हा परिषद रत्नागिरीचा २०२२-२३ चा आदर्श शाळा पुरस्कार दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोळबांद्रे नं. १ ला मिळाल्याबद्दल शाळेत गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दुपारी महिला मेळावा कार्यक्रमामध्ये ब्रह्माकुमारी सारिका बहेनजी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित्त गटशिक्षणाधिकारी आण्णासाहेब बळवंतराव यानी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. माजी सभापती उन्मेश राजे, अलेक्स बेबी, सरपंच रघुनाथ गुरव, गाव अध्यक्ष कृष्णा बेर्डे, शांताराम मोहिते दशरथ बेर्डे सुनील कुळे, अविनाश लोखंडे, सायली कराडे, स्नेहल भुवड, दिनेश कराडे व शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य व गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत शिगवण यांनी शाळा म्हणजे बालक,पालक व शिक्षक ह्यांतील असणारा समन्वय आहे असे उद्गार काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com