
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना बांदा केंद्रशाळेमध्ये अभिवादन
01254
बांदा ः केंद्रशाळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना
बांदा केंद्रशाळेमध्ये अभिवादन
बांदा ः सामाजिक समतेचा आग्रह धरत आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त बांदा केंद्र शाळेत अभिवादन करण्यात आले. १०० सेकंद नि:शब्द राहत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मानवंदना देत लोकराजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाला गतवर्षी ६ मेस सुरुवात झाली होती. शनिवारी (ता.६) या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप झाला. यावेळी कनिष्का राजन केणी हिने शाळेसाठी शाहू महाराज यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. यादिवशी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिक्षकांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा सांगितला.
----------
01255
बांदा ः नट वाचनालयात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
बांदा नट वाचनालयात शाहूंना वंदन
बांदा ः येथील नट वाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. वाचनालायचे अध्यक्ष एस. आर सावंत यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जनतेविषयी विशेष कळवळा होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना अंमलात आणल्या. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून मान्यता होती. त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगितले. यावेळी संचालक जगन्नाथ सातोसकर, नीलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदींसह वाचक उपस्थित होते.