
दापोलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
दापोलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
दापोलीः येथील कोकण कृषि विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेले एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अनोळखी व्यक्तीने ४ मे रोजी रात्री एटीएममध्ये प्रवेश करून मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच एटीएममधील रक्कम काढण्याचाही प्रयत्न केला. एटीएमच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही मोडतोड केली. याबाबत अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
--------
झाडावरून पडून जखमी झालेल्याचे निधन
गुहागरः तालुक्यातील विसापूर, कारूळ येथील राहणारा संदीप श्रीराम देर्देकर हे २३ एप्रिलला घराच्या आवारातील फणसाच्या झाडावर चढला होता. त्याला चक्कर आल्याने तो खाली पडल्याने त्याला गंभीर जखमी झाला होता. त्याला प्रथम डेरवण येथे त्यानंतर मुंबईला सायन रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-----
रेल्वे प्रवासात हॅन्डबॅग लांबवली
रत्नागिरीः रेल्वे प्रवासादरम्यान झोपलेल्या प्रवाशांची हॅन्डबॅग लांबवून अनोळखी व्यक्तीने सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. ही घटना ३ एप्रिल रोजी रत्नागिरी रेल्वेस्टेशन स्थानकावर घडली होती. याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ३ एप्रिल रोजी ते पत्नी आणि त्यांचे सासरे असे मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुलकी रेल्वेस्टेशन येथून ठाणे येथे जात होते. प्रवासात ते सर्व झोपलेले असताना चोरट्याने त्यांची हॅन्ड बॅग लांबवली. त्या बॅगमध्ये ३८ हजार २२० रुपयांचे मणी मंगळसूत्र, ३ हजार २०० रुपयांची अंगठी आणि ६ हजार २५ रुपयांचा मोबाईल असा एकूण ४७ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल होता.
----------
पायवाटेवर नेपाळी खलाशाचा मृतदेह
रत्नागिरीः शहरानजीकच्या पांढरा समुद्र येथील पायवाटेवर नेपाळी खलाशाचा मृतदेह मिळाला. या प्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास उघडकीस आली. रुवम कालुराम डगौरा (३५, मुळ रा. कैलाली, नेपाळ सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. याबाबत बोटीला कलरकाम करणाऱ्या कामगाराने शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शनिवार ६ मे रोजी दुपारी १२ वाजता बोटी कलर करण्याचे काम सुरु असताना त्यांना रुवम कोठेही दिूसन आला नाही. म्हणून त्यांनी आजुबाजुला रुवमचा शोध घेतला असता पांढरा समुद्र येथील दुसऱ्या पायवाटेवर त्यांना रुवम बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसून आला. फिर्यादी यांनी बोटमालकाच्या मदतीने रुवमला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.
--------
चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोला अपघात
रत्नागिरीः बेदरकारपणे टेम्पो चालवल्याप्रकरणी जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.अपघाताची ही घटना शनिवारी (ता. ६) सव्वा बाराच्या सुमारास निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरील चाफे तिठानजीक घडली. याप्रकरणी टेम्पा चालक श्रीकांत गुलाबराव जाधव (४५) याच्या विरोधात जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी श्रीकांत जाधव टेम्पो भरधाव वेगाने घेऊन निवळी ते जयगड असा जात होता. तो चाफे तिठ्यापासून २०० मीटर अंतरावर आला असता त्याचा टेम्पावरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या विरुध्द दिशेला गेल्याने अपघात झाला. या अपघतात टेम्पोचे नुकसान झाले असून अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.