राजापूर अर्बन बँकेचा विनम्र, तत्पर सेवेचा वसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर अर्बन बँकेचा विनम्र, तत्पर सेवेचा वसा
राजापूर अर्बन बँकेचा विनम्र, तत्पर सेवेचा वसा

राजापूर अर्बन बँकेचा विनम्र, तत्पर सेवेचा वसा

sakal_logo
By

rat7p39.jpg.
01264
राजापूरः तळेरे शाखेचे उद्घाटन व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसाद मोहकर, अनिलकुमार करगुटकर, शेखरकुमार अहिरे, जमीर खलिफे.

राजापूर अर्बन बँकेचा तत्पर सेवेचा वसा
तळेरे शाखेचे उद्घाटन; बँकेच्या एटीएम सेवेचा प्रारंभ
राजापूर, ता. ७ : सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक म्हणून राजापूर अर्बन बँकेची ख्याती आहे. अत्याधुनिक सेवेची कास धरताना बँकेने ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देण्याचा घेतलेला वसा या तळेरे शाखेतही आपणाला दिसेल आणि तळेरेवासीयांच्या भक्कम पाठींब्यावर भविष्यात राजापूर अर्बन बँकेची ही शाखा अव्वल ठरेल असा विश्वास राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी व्यक्त केला.
येथील राजापूर अर्बन बँकेच्या ११ व्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौथ्या तळेरे शाखेचा आरंभ रविवारी उत्साहात झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून काझी बोलत होते. या नव्या शाखेचे उद्घाटन बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्रनाथ ठाकुरदेसाई, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे यांच्या हस्ते झाले. याचवेळी बँकेच्या एटीएम सेवचा प्रारंभ व्यापारी संघाचे अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, उद्योजक तेजस जमदाडे यांच्या हस्ते झाला.
प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र जठार यांनी बँकेच्या तळेरे शाखेला शुभेच्छा देताना बँकेने तरूण उद्योजकांसाठी कर्जाच्या व्याजात सवलत द्यावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी बँकेच्या तळेरे शाखेचे इंटिरियचे काम करणारे प्रणव लोटलीकर, संगणकाचे काम करणारे संदीप पुजारी, जागा मालक तेजस जमदाडे यांचा बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या हस्ते बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक तसेच अधिकारी लक्ष्मण म्हात्रे, रमेश काळे, कमल चव्हाण, आयटी विभागाचे प्रमुख प्रसन्न खांबे उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, जमिर खलिफे, रवींद्रनाथ ठाकुरदेसाई, रवींद्र जठार, हनुमंत तळेकर,दिलीप तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे आदी उपस्थित होते.