कोळंबाच्या जयघोषाने अवघी नांदगावनगरी दुमदुमली

कोळंबाच्या जयघोषाने अवघी नांदगावनगरी दुमदुमली

01269
नांदगाव ः श्री देव कोळंबा जत्रेसाठी दर्शन रांगेत उभे असलेले भाविक.

01270
नांदगाव ः श्री देव कोळंबा पाषाण मूर्तीला भाविकांनी अर्पण केलेले पुष्पहार. (छायाचित्र ः पल्लवी सावंत)

कोळंबाच्या जयघोषाने अवघी नांदगावनगरी दुमदुमली

कोळंबा देव जत्रोत्सवास भक्तांचा महासागर; महाप्रसादाला भाविकांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ७ ः येथील श्री देव कोळंबा देवाच्या जत्रेला आज भक्तांचा महासागर उसळला. संपूर्ण नांदगाव परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.‌ नवसाला पावणारा.....हाकेला धावणारा आणि मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध अशी जत्रा म्हणून ओळखली जाणारी ही जत्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. कोळंबाच्या जयघोषाने अवघी नांदगावनगरी दुमदुमली. नवस फेडण्यासाठी कोंबडी, बकरा घेऊन व सायंकाळी मटण भाकरीच्या महाप्रसादाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सिंधुदुर्गासह महाराष्ट्र व इतर राज्यात प्रसिध्द असणाऱ्या श्री देव कोळंब जत्रौत्सवाला आज सकाळी सुरवात झाली. सकाळीच जत्रोत्सवानिमित्त नवस बोलणे व नवस फेडणे तसेच सायंकाळच्या सत्रात जत्रेचे वेगळेपण असणारे मटण व भाकरीच्या प्रसादासाठी भाविकाची झुंबड उडाली होती. जिल्ह्याभरासह राज्याच्या अनेक भागातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री देव कोळंबाचे मनोभावे दर्शन घेतले. तत्पूर्वी आज सकाळी मानकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देव कोळंबाची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यात्रोत्सवासाठी भाविकांची सकाळपासून आगमन होत होते. सकाळच्या सुमारास यात्रा परिसर नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबडी, बकरे घेऊन भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. भाविकांनी सूर्योदयापासून श्री देव कोळंबाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लावली होती.
दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही लांबलचक झाली होती. यानंतर नवीन नवस बोलण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावर्षी कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबर मुंबईकर चाकरमानी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, पदाधिकारी, पर्यटक, इतर राज्यातील भाविकांनी हजेरी लावत कोळंबा यात्रेसाठी एकच गर्दी केली होती. यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोरये व नांदगाव ग्रामस्थांनी यात्रेचे परिपूर्ण नियोजन केले होते. यावेळी वाहनासाठी पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांगेची व्यवस्था, विविध वस्तू व खाद्याची दुकाने, ठिकठिकाणी पाणपोई, आरोग्य केंद्राचे पथक, स्वयंसेवक यामुळे यात्रेमध्ये सुरळीपणा जाणवत होता. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर झळाळून निघत भक्तांचा जनसागर ऊसळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com