तीन एकरांतील बागयत खाक

तीन एकरांतील बागयत खाक

01275
पाडलोस ः येथे आग अटोक्यात आणताना शेतकरी.

तीन एकरांतील बागायत खाक

पाडलोस-केणीवाड्यातील घटना; शॉर्टसर्किटमुळे तीन लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः पाडलोस-केणीवाडा येथे आज दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आंबा, काजू बागायतीस आग लागली. यात पाच शेतकऱ्यांची सुमारे तीन एकरावर असलेली ४०० ते ५०० काजू, आंबा कलमे, बांबूची झाडे असे मिळून तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येण्यास नकार दिल्याचे शेतकरी अमोल नाईक यांनी सांगितले.
पाडलोस केणीवाडा येथून वीज वितरणची मुख्य लाईन जाते. गणेश चतुर्थी दरम्यानही याच लाईनवर स्पार्क होऊन चार ग्रामस्थ थोडक्यात बचावले होते. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केणीवाडा येथील आंबा काजू बागायतीमधून जाणाऱ्या वाहिन्यांवर शॉर्टसर्किट झाले. परिसरात सुके गवत असल्याने आग जलद गतीने पसरली गेली. आग लागल्याचे निदर्शनास येतात शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत शर्तीचे प्रयत्न केले. परंतु, वाऱ्याचा वेग मोठा असल्याने आग नियंत्रणा बाहेर गेली अन् ४०० ते ५०० काजू कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली. शेतकरी मदन कुबल, महादेव नाईक, प्रभाकर कुबल, अमोल कोरगावकर, सप्रेम परब यांचे नुकसान झाले.
शेतकरी नाईक यांनी वीज वितरण अधिकारी अनिल यादव यांच्याशी संपर्क साधत सविस्तर माहिती दिली. मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने आपण आज येऊ शकत नसल्याचे श्री. यादव यांनी सांगितल्याचे नाईक यांनी सांगितले. दोन-दोन महिने नकाशा मिळत नसल्याने आम्ही करायचे तरी काय? असा सवाल श्री. नाईक यांनी अधिकाऱ्यांना केला. आग विझविण्यासाठी शेतकरी अमोल नाईक, सप्रेम परब, अमोल कोरगावकर, भूषण केणी, महादेव नाईक, अमित अमरे, ओमकार कोरगावकर, बंटी नाईक, संदीप कुबल, प्रभाकर कुबल, गोकुळदास परब, गोविंद पराडकर, सदानंद कोरगावकर, अजित कोरगावकर, दत्ता आदी ग्रामस्थांनी आग विझविली. भरदुपारी आग विझविण्यासाठी आलेले दोन शेतकरी आगीच्या ज्वाला बसल्याने अस्वस्थ झाले.
------------
चौकट
वारंवार शॉर्टसर्किट
वारंवार असे शॉर्ट सर्किटचे प्रकार होत असून वीज महावितरणचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना अशा नुकसानी सामोरे जावे लागत असल्याचे सांगत उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरणवर तीव्र रोष व्यक्त केला.
--------------
कोट
सोमवारी सकाळी नऊच्या प्रत्यक्ष पाहणी करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी येताना आवश्यक ती कागदपत्रे घेऊन यावे.
- अनिल यादव, कनिष्ठ सहायक अभियंता, बांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com