मधमाशांच्या हल्ल्यात ३० जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात ३० जखमी

मधमाशांच्या हल्ल्यात ३० जखमी

ओटवमधील घटना; होम हवन सुरू असताना प्रकार

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ७ ः ओटव गावात पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान होम हवन सुरू असताना झालेल्या धुरामुळे मधमाशांनी नागरीकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ३० जण जखमी झाले असून चौघे गंभीर आहेत. जखमींवर येथील खासगी व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की ः ओटव येथे धरण झाल्यानंतर त्यामध्ये बाधीत झालेल्या श्री पावणादेवी मंदिराची पुन्हा उभारणी केल्याने मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजन केला होता. यावेळी उद्या (ता.८) या मंदिराचा मुख्य सोहळा असताना आजपासून धार्मिक विधी सुरू होते. याचवेळी सकाळी होम हवन करताना धूर झाला. याच दरम्यान मंदिराच्या बाजूला असणाऱ्या झाडावर मधमाशी पोळ्याजवळ हा धुर पसरला. त्यामुळे माश्यांनी तेथे असलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. सुमारे दोनशे नागरिक यावेळी उपस्थित होते. मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उपस्थित नागरिक सैरावैरा पळू लागले; मात्र, मधमाश्यांनी त्यांच्यातील काहीजणांवर हल्ला चढवला. यात काहीजण जखमी झाले. त्यांच्यावर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदगाव खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमेश आत्माराम ओटवकर, हेमंत रामचंद्र ओटवकर (वय ५२), गौरेश अभय ओटवकर (वय १७), संतोष मधुकर सावंत (वय ३२ सर्व रा. ओटव) यांनी उपचार घेतले. तर खासगी रुग्णालयातील दोघे मिळून ३० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून यातील चारजण गंभीर जखमी होते. सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली.
-------------------
करूळ येथेही तिघे जखमी
कणकवली ः करूळ (ता.कणकवली) येथे शेतीची कामगत सुरू असताना आगीच्या धुरामुळे मधमाशांनी हल्ला केल्याने तिघेजण जखमी झाले. आनंद सदाशिव कासले (वय ४२), पूर्वा आनंद कासले (वय ३०) आणि रुणाली चिंतामणी कासले (वय २७ सर्व रा. करूळ कदमवाडी), अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
करूळ कदमवाडी येथे कासले कुटुंबीयांनी घरालगत असलेला सुका पालापाचोळा गोळा करून त्याला आग लावली होती. त्या आगीचा धुर परिसरात पसरला. त्यामुळे एका झाडावरील मधमाशांच्या पोळ्यापर्यंत हा धुर पोहोचल्यानंतर मधमाशांनी तिघांवर हल्ला केला. जखमींना तातडीने येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com