आंबेरीत दुचाकी अपघातात ओटवणेतील वृध्दाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेरीत दुचाकी अपघातात
ओटवणेतील वृध्दाचा मृत्यू
आंबेरीत दुचाकी अपघातात ओटवणेतील वृध्दाचा मृत्यू

आंबेरीत दुचाकी अपघातात ओटवणेतील वृध्दाचा मृत्यू

sakal_logo
By

१३०३

दुचाकी झाडावर आदळून
ओटवणेतील वृद्धाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः दुचाकी झाडाला आदळून तीस ते पस्तीस खोल घळणीत कोसळून झालेल्या अपघातात ओटवणे येथील वृध्द ठार झाला. हा अपघात काल (ता.६) सायंकाळी साडेसात वाजता आंबेरी-खिश्चनवाडी परिसरात घडला. सिताराम भिकाजी शृंगारे (वय ६०) असे मृताचे नाव आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळ ओटवणे येथे राहणाऱ्‍या श्री. शृंगारे यांनी माणगाव वाडोस येथे घर बांधले आहे. काल ते कामानिमित्त त्या ठिकाणी गेले होते. मात्र, तेथून परतत असताना आंबेरी येथे वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली व त्यानंतर ते गाडीसह घळणीत कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. डी. पाटील व अन्य सहकाऱ्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.