पान एक-स्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

पान एक-स्विमिंग पूलमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

पान एक

१३०४
१३०५

स्विमिंग पूलमध्ये
बुडून युवकाचा मृत्यू
सावंतवाडीत घटना; मृत चराठा येथील
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः येथील पालिकेच्या स्विमिंग पुलात पोहण्यासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ग्लेन जॉन डिसोझा (वय २०, रा. चराठे, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुलाने स्विमिंग पुलात उडी मारल्यानंतर तो वरच आला नसल्याचा दावा तेथे प्रशिक्षण देणाऱ्यांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून मुलाची बॅग, मोबाईलसह इतर साहित्य ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
अधिक माहिती अशी, येथील पालिकेचे जिमखाना मैदानाशेजारी स्विमिंग पूल गेली अनेक वर्षे बंद होते. मात्र, मागील पाच महिन्यांपासूनच पालिकेमार्फत ते खासगी ठेकेदारास चालवण्यास दिला होता. त्याचा ठेका शहरातीलच एका संस्थेला देण्यात आला होता. ते येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण देत होते. ग्लेन डिसोझा हा एक महिन्यापूर्वीच याठिकाणी आला होता. तो चांगला प्रशिक्षितही झाला होता. आज सायंकाळी पाचच्या सुमारास तो स्विमिंगसाठी आल्यानंतर त्याने प्रथम स्विमिंग पुलात उडी मारली. मात्र, बराच वेळ तो वरच आला नसल्याने लागलीच प्रशिक्षकांनी त्याला बाहेर काढले. तोपर्यत तो बेशुद्ध झाला होता. त्याला स्विमिंग पुलातून बाहेर काढून येथील कुटिर रुग्णालयात हलविले; पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी तसेच येथील पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तेथे कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षकाकडून माहिती घेतली. पोलिसांनी ग्लेन याचे कपडे, मोबाईल व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. ग्लेन याच्या नातेवाईकांना पोलिसांनी संर्पक केला. नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्काच बसला. पोलिसांनी त्यांना सावरले. तरीही त्यांचा घटनेवर विश्‍वास बसत नव्हता. दरम्यान, आम्ही सध्या माहिती घेत आहोत. यात कुणाची चूक झाली का? कुणाच्या निष्काळजीपणामुळे ग्लेन याचा मृत्यू झाला का? हे सर्व तपासण्यात करण्यात येणार असून त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अधिकारी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस करीत आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चराठा येथील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. ग्लेनच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com