मिठमुंबरी येथे विहिरीत
पडलेल्या वृद्धाचा मृत्यू

मिठमुंबरी येथे विहिरीत पडलेल्या वृद्धाचा मृत्यू

मिठमुंबरी येथे विहिरीत
पडलेल्या वृद्धाचा मृत्यू
देवगड, ता. ७ ः बागेतील विहिरीत पडलेल्या मिठमुंबरी (ता.देवगड) येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला. अनिल तुकाराम डामरी (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी निदर्शनास आली. घटनेची येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल डामरी हे बागेतील विहिरीत पडल्याचे आढळले. त्यांना विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले; मात्र, त्यांचा मृत्यू झाला. संजय अनिल डामरी (वय ३८) यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. देवगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--
लवू सावंत खूनप्रकरणी
भावास न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी, ता. ७ ः ओवळीये येथील माजी उपसरपंच लवू सावंत यांच्या खून प्रकरणी पोलिस कोठडीत असलेला त्यांचा लहान भाऊ अजित सावंत यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना काल (ता.६) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कालच त्यांची कोठडीची मुदत संपत होती; परंतु, रुग्णालयात दाखल असल्याने आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानुसार आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com