
सकारात्मक विचारातून सशक्त राहा ः हेर्लेकर
01325
सिंधुदुर्गनगरी ः येथील शरद कृषी भवन येथे रविवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा झाला. यावेळी उपस्थित जोडपी व मान्यवर.
सकारात्मक विचारातून
सशक्त राहा ः हेर्लेकर
ओरोस येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः आपण जन्माने दिव्यांग असाल, शरीराने कसेही असले तरी मात्र जीवनात नेहमी सकारात्मक विचार ठेवून मनाने सशक्त राहा, असे प्रतिपादन कोल्हापूरचे धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी ओरोस येथे व्यक्त केले.
येथील शरद कृषी भवन येथे आज सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर विभागाचे धर्मदाय सह आयुक्त हेर्लेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव डी. बी. म्हालटकर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग सौ. एम. एस. निकम, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व्हिक्टर डान्टस, साहस डिसएबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशन कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉ. नसीमादीदी हुरजूक, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सिंधुदुर्गचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, सचिव अशोक पाडावे, उपाध्यक्ष फादर मनवेल डिसिल्वा, अधीक्षक अरुण भुईंबर, ऑडिटर तथा समन्वयक अभय सुकाळे, खजिनदार ल. म. सावंत, सहसचिव ॲड. पूर्वा ठाकूर, परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब, समितीचे सदस्य गोविंद नार्वेकर पांडुरंग केळुसकर, गुरुनाथ गणपत्ये, संतोष लब्धे, राजन पांचाळ विनायक कांबळी, सदानंद हाडकी, निषाद परुळेकर, डॉ. प्र. द. प्रभूसाळगावकर, ॲड. युक्ता ढवळ, श्री विनायक अण्णा राऊळ महाराज ट्रस्ट, पिंगुळी व परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, पिंगुळीचे उपाध्यक्ष दशरथ राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर व समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
ॲड. पार्सेकर म्हणाले, ‘‘शासनाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हा अभिनव उपक्रम राबविला असून याची दखल जिल्ह्यातील अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी घेतली. पुढील वर्षी याहीपेक्षा उदंड प्रतिसाद मिळावा व अत्यंत कमी खर्चात दर्जेदार पद्धतीने गोरगरीब वधू-वरांचे लग्न पार पाडण्याचे सद्भाग्य लाभो.’’ उपस्थित मान्यवरांचा, दात्यांचा व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यरत असलेल्या मान्यवरांनी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केल्याचे अध्यक्ष पार्सेकर यांनी सांगितले. या दात्यांमध्ये विशेषतः वधू-वरांसाठी लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तू सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी भेट दिल्या. श्री समर्थ साटम महाराज ट्रस्ट, दाणोली, श्री गजानन देवस्थान, नागोळे रेडी, श्री इनामदार, श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरा, श्री भगवती देवी देवस्थान मुणगे, श्री परमहंस भालचंद्र महाराज संस्थान ट्रस्ट कणकवली, श्री विनायक अण्णा राऊळ महाराज ट्रस्ट, पिंगुळी, परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, पिंगुळी, श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली, श्री कुणकेश्वर देवस्थान कुणकेश्वर, श्री मधुकर शंकर गुरव या दात्यांनी मदत केल्यामुळे तसेच शरद कृषी भवन विनामूल्य विवाह सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व्हिक्टर डांटस यांचेही आभार समितीचे ॲड. पार्सेकर यांनी मानले. दरम्यान, या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित असलेले धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर हेर्लेकर यांच्यासह सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्गच्या सौ. एम. एस. निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव डी. बी. म्हालटकर, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, साहस डिसॲबिलिटी रिसर्च अँड केअर फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संस्थापक डॉ. नसीमादीदी हुरजूक, व्हिक्टर डांटस आदींनी नववधू-वरास आशीर्वाद दिले. प्रा. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. समितीचे अध्यक्ष ॲड. पार्सेकर यांनी आभार मानले.
---------------
चौकट
पाच जोडपी दिव्यांग
सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्यात यावर्षी समितीचे अध्यक्ष ॲड. पार्सेकर तसेच या विवाहसाठी विशेष मेहनत घेतलेले अनिल शिंगाडे व श्रद्धा कदम यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे तब्बल ८ जोडपे विवाहबद्ध झाली. या सर्वांचा गृहस्थाश्रमात प्रवेश मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. या आठ जोडप्यांपैकी पाच जोडपे हे दिव्यांग बांधव असून समितीने केलेले हे कार्य इतर जिल्ह्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, असेही उद्गार मान्यवरांच्या मनोगतातून यावेळी अभिव्यक्त झाले.