देवधेतील नवलाई नमन मंडळ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवधेतील नवलाई नमन मंडळ प्रथम
देवधेतील नवलाई नमन मंडळ प्रथम

देवधेतील नवलाई नमन मंडळ प्रथम

sakal_logo
By

११ (टुडे पान ३ साठी)


-rat८p२.jpg-
२३M०१३६५
रत्नागिरी ः विजेत्या संघाला बक्षीस देताना सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गराटे, अध्यक्ष सुनील डांगे आणि पदाधिकारी.
---

देवधेतील नवलाई नमन मंडळ प्रथम

राम-रावण युद्ध नृत्य स्पर्धा ; आई बनदेवी नाट्य नमन मंडळ द्वितीय

रत्नागिरी, ता. ८ ः तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळ पुरस्कृत जिल्हास्तरीय राम-रावण नृत्य स्पर्धेमध्ये नवलाई नमन मंडळ हरमलेवाडी (देवधे, लांजा) नमन मंडळाने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम येण्याचा मान पटकावला. द्वितीय क्रमांक आई बनदेवी नाट्य नमन (गवाणे, लांजा) या मंडळाने आणि तृतीय क्रमांक आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ (हातखंबा सनगरेवाडी) या मंडळाने मिळवला.
कोकणचे नमनखेळे ही पारंपरिक लोककला जागृत ठेवण्यासाठी मंडळाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नवलाई नमन मंडळ, (हरमलेवाडी-लांजा), आई बनदेवी नाट्यमंडळ (गवाणे लांजा), जुगाई देवी नमन मंडळ (मांजरे), जय गणेश मित्रमंडळ (पाडावेवाडी- मिरजोळे), आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ (हातखंबा सनगरेवाडी), नवतरुण नमन मंडळ (तळेकांटे-रेवाळेवाडी), नमन मंडळ (भायजेवाडी वेळवंड), पावणादेवी मंडळ (देऊड जाकादेवी), क्रांती कलामंच नमन मंडळ (तारवेवाडी) तसेच सोमेश्वर नाट्य नमन मंडळ (वांद्री) अशा १० मंडळांनी सहभाग घेतला होता.
पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गराटे यांनी सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला कोकण नमन कलामंचाचे जिल्हाध्यक्ष पी. टी. कांबळे यांची उपस्थिती लाभली. या वेळी गुणवंत कलाकारांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुनील डांगे व सल्लागार प्रकाश डांगे यांनी मंडळाच्या प्रगतीबाबत प्रास्ताविक केले. राम-रावण नृत्य स्पर्धेसाठी अभ्यासू व उत्कृष्ट परीक्षणातून नमन मंडळाना मोलाचे मार्गदर्शन करणारे गोसावी, महेश कांबळे व संदेश रावणंग यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.