छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

sakal_logo
By

१४ (टुडे पान ३ साठी)


-rat८p६.jpg-
२३M०१३६९
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी.
----------
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात
छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

रत्नागिरी, ता. ८ ः समतावादी, लोककल्याणकारी लोकराजे, आरक्षणाचे जनक असे विविध नामाभिधान प्राप्त असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविकात समारंभ समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोरनेते होते. महात्मा जोतीबा फुले यांच्या मानवतावादी विचार आणि कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. या प्रसंगी हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. शाहू मधाळे, प्रबंधक रवींद्र केतकर, विविध प्राध्यापक, समारंभ समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रा. शिवाजी उकरंडे यांनी आभार मानले.