आरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षण
आरक्षण

आरक्षण

sakal_logo
By

उन्हाळी विशेष रेल्वेचे
आरक्षण फुल्ल
रत्नागिरी : सुटीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली असून, या २६ अतिरिक्त गाड्यांसह यंदा उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या ९४२ होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्या असल्या तरी या गाड्यांचे आरक्षण फुल आहे. मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण मार्गावर ९४२ उन्हाळी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी काहींना जिल्ह्यात ठराविक थांबेच आहेत. काेकणात येणारे आणि जाणारे यांची संख्या आता सुटी सुरू झाल्याने वाढली आहे. त्यामुळे जूनपर्यंत आरक्षण फुल्‍ल आहे. उन्हाळ्याच्या हंगामात मुंबईकडून येणारे आणि जाणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे सध्या या मार्गावरील सर्वच गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या कोकण कन्या, मत्स्यगंधा, मेंगलोर, तुतारी, तेजस, जनशताब्दी, दिवा सावंतवाडी, रत्नागिरी दिवा, मंगला एक्स्प्रेस या गाड्यांच्या आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागते.