विकास निधी कमी पडू देणार नाही

विकास निधी कमी पडू देणार नाही

01421
मळेवाड ः सांस्कृतिक पर्यटन महोत्सव सांगता समारंभाचे उद्‍घाटन करताना माजी खासदार नीलेश राणे. शेजारी राजन तेली, संजू परब, सरपंच मिलन पार्सेकर आदी. (छायाचित्र ः धनश्री मराठे)

विकास निधी कमी पडू देणार नाही

नीलेश राणे; मळेवाड सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाची सांगता

मळेवाड, ता. ८ ः भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात विकास निधी मोठ्या प्रमाणात येत आहे. मळेवाड-कोंडुरे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार नीलेश राणे यांनी येथील पर्यटन महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात दिली. महोत्सवाला सहा वर्षे पूर्ण झाली असून याचा शतक महोत्सव व्हावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
येथील पर्यटन महोत्सव २०२३ चा सांगता समारंभ माजी खासदार राणे यांच्या उपस्थितीत झाला. मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत व युवा मित्रमंडळ मळेवाड-कोंडुरे यांच्यावतीने या पाच दिवसीय युवा सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मळेवाड येथील ज्येष्ठ नागरिक श्रीधर नाईक यांच्या हस्ते नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी महोत्सवाला शुभेच्छा देत गाव पातळीवर असे महोत्सव आयोजित करणे गरजेचे असून त्यात सातत्य ठेवणे फार कठीण असते; मात्र हे सातत्य ठेवण्यात मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत व युवा मित्रमंडळाने यशस्वीरित्या राखले आहे, असे मत व्यक्त केले. भाजप जिल्हा सचिव तथा माजी आमदार राजन तेली यांनी विकास निधी मिळविण्यासाठी कामात सातत्य राखणे गरजेचे असून ते मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत राखत आहे. या गावाला भरघोस निधी मिळावा, यासाठी उपसरपंच हेमंत मराठे वारंवार पाठपुरावा करत असून आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी त्यांनी भाजपच्या माध्यमातून या गावाला मंजूर करून घेतला आहे. भविष्यातही या गावाच्या विकासासाठी निधी मिळावा, यासाठी त्यांची मागणी असून त्यांच्या मागणीनुसार भाजपच्या माध्यमातून या गावाला भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन तेली यांनी दिले. ज्या जागेवर महोत्सव होतो, त्या ठिकाणी बालोद्यान उभारण्याचा उपसरपंच मराठे यांचा मानस असून त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत आवश्यक निधी देण्यात येईल, असेही तेली यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
---
‘सप्तरंग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
आर्या मुळीक हिच्या स्वरचित कवितांचा ‘सप्तरंग’ काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद व मळेवाड ग्रामपंचायत यांच्यावतीने आयोजित साहित्य संमेलनात आर्याने हा कवितासंग्रह सादर केला होता. यावेळी हा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा शब्द सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच मराठे यांनी दिला होता. त्यानुसार पर्यटन महोत्सवामध्ये कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर उद्योजक दत्ता गोठणकर, उद्योजक सुरेश बोवलेकर, प्रा. राजाराम परब, प्रा. रुपेश पाटील, भाजप शक्ती केंद्र प्रमुख लाडोबा केरकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, मधुकर जाधव, खुशी कुंभार, कविता शेगडे, सानिका शेवडे, अर्जुन मुळीक, भिवसेन मुळीक, शुभम धुरी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com