नेरुरमध्ये ३६ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुरमध्ये ३६ जणांचे रक्तदान
नेरुरमध्ये ३६ जणांचे रक्तदान

नेरुरमध्ये ३६ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

01403
नेरुर ः फुगडी स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना दिव्या गावडे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

नेरुरमध्ये ३६ जणांचे रक्तदान

शिबिरास प्रतिसाद; श्री भवानी वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

कुडाळ, ता. ८ ः नेरुर येथील श्री देवी भवानी मंदिराचा पाचवा वर्धापन नुकताच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी विविध उपक्रमांनी उत्साहात झाला. यानिमित्त भवानी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर झाले. नेरुर सरपंच भक्ती घाडी, ओबीसी सेल प्रमुख रुपेश पावसकर, माजी सरपंच शेखर गावडे, माजी उपसरपंच समद मुझावर, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गावडे, व भवानी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी उपस्थित ६० पैकी ३६ जणांनी रक्तदान केले.
यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीकडूनही मोलाचे सहकार्य लाभले. वर्धापन दिनानिमित्त निमंत्रितांची जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन नेरुर सरपंच घाडी, ग्रामपंचायत सदस्य अरुणा चव्हाण, निकिता सडवेलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दिव्या गावडे, भवानी बचतगट व ब्राह्मण बचतगटाच्या महिलांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. या स्पर्धेत खाजणादेवी आसोली, श्री देवी सातेरी अणसूर, व सखी फुगडी संघ पावशी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. इतर वैयक्तिक पुरस्कारही देण्यात आले. परीक्षक म्हणून भूषण बाक्रे, अदिती दळवी यांनी काम पाहिले. दिव्या गावडे, प्रीती गावडे, गौरी गवाणकर, प्रांजल गावडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. फुगडी स्पर्धेसाठी गणेश म्हाडदळकर, चिन्मय सडवेलकर, राकेश गावडे, बाबल गावडे, उत्तम गावडे, दिव्या गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. २ ला लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स व त्यानंतर जय हनुमान दशावतार यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. अध्यक्ष धोंडी कांबळी यांनी आभार मानले.