आंबडोस गाव जिल्ह्यातील ‘मॉडेल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबडोस गाव जिल्ह्यातील ‘मॉडेल’
आंबडोस गाव जिल्ह्यातील ‘मॉडेल’

आंबडोस गाव जिल्ह्यातील ‘मॉडेल’

sakal_logo
By

01420
आंबडोस ः भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांचा सत्कार करताना ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी सोबत सरपंच सुबोधीनी परब, माजी सरपंच राधा वरवडेकर, उपसरपंच रामदास नाईक, मंडळ अध्यक्ष बाळा आरोसकर आदी.


आंबडोस गाव जिल्ह्यातील ‘मॉडेल’

भाजप प्रदेश सदस्य सामंत; शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः जिल्ह्यात मॉडेल म्हणून आंबडोस गावाकडे पाहिले जाते. उंच शिखरावर हा गाव गेला आहे. ती उंची कायम टिकवून ठेवण्यासाठी आताच्या सर्वांनी प्रयत्न करावा. कार्याचा वसा सर्वांनी पुढे न्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी आंबडोस येथे केले.
आंबडोस शाळा क्रमांक १ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त रविवारी (ता.७) आंबडोस ग्रामविकास मंडळातर्फे या शाळेला योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व मुलांचा गौरव कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सामंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुबोधीनी परब होत्या. यावेळी मंडळ अध्यक्ष बाळा आरोसकर, माजी सरपंच दिलीप परब, माजी सरपंच राधा वरवडेकर, माजी सरपंच विष्णू परब, उपसरपंच रामदास नाईक, शिक्षक धानजी चव्हाण, शिक्षिका स्वप्नाली शिंदे, बाळा धुरी, अंकुश धुरी, माजी अध्यक्ष लक्ष्मण धुरी, अरुण धुरी, अमृत राणे, आप्पा परब, शिवाजी नाईक, रामा परब, सचिन धुरी, शहाजी करावडे, सचिव अजय नाईक, धोंडी नाईक, रवी आरोसकर, रमाकांत नाईक, बाळा नाईक, कमलाकर कदम, सुनील कदम, शांताराम धुरी, काका वरवडेकर आदी उपस्थित होते. सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे पहिले शिक्षक सखाराम उर्फ भाऊ पाटकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ही शाळा उभारण्यासाठी आठ गुंठे जागा दाजी उर्फ गोविंद धुरी विनामूल्य दिली. त्यामुळे शाळेत त्यांची प्रतिमा बसविली आहे. त्याचे अनावरण सरपंच परब यांच्याहस्ते झाले. प्रास्ताविक करताना सचिव अजय नाईक यांनी मंडळ करीत असलेली मदत सांगितली. गावातील शाळांना साहित्य पुरविले गेले. प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. कोरोना काळातही औषधे पुरविली, असे सांगितले. यावेळी शिक्षक धानजी चव्हाण, बाळा धुरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
श्री. सामंत म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडोस क्रमांक १ शाळेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जमीन दिलेल्या व्यक्तींचे स्मरण आज करण्यात आले. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आंबडोस ग्रामविकास मंडळासारखे कार्य जिल्ह्यात दुसऱ्या मंडळाचे नाही. आंबडोसच्या कामाची पद्धत आम्ही आमच्या गावात सांगायचो. गावातील एकीची उदाहरणे आम्ही आमच्या गावात द्यायचो. धानजी चव्हाण यांची शिक्षक म्हणून या शाळेतील १५ वर्षाची कारकीर्द सुवर्ण अक्षराने लिहावी.’’ यावेळी माजी शिक्षक चव्हाण यांनी मुंबई मंडळाच्या सदस्यांनी दागिने गहाण ठेवत शाळा इमारत उभारणीसाठी आर्थिक मदत केली. धुरी यांनी आठ गुंठे जागा दिली. इमारत उभी करीत जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिली. १५ वर्षे शिक्षक म्हणून काम पाहिले. माझ्यासाठी तो सुवर्णकाळ होता, अशी भावना व्यक्त केली. माजी सरपंच दिलीप परब यांनी मधल्या काळात या शाळेला उंची गाठण्यासाठी आपण सरपंच असताना ग्रामस्थ व ग्रामपंचायतने प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी शिक्षिका शिंदे, लक्ष्मण धुरी, धोंडी नाईक यांनीही विचार मांडले. आप्पा परब यांनी सूत्रसंचलन केले.
--------------------
चौकट
सरपंचांकडून सहकार्याची हाक
आपल्याला गावात बौद्धिक, मानसिक विकास साधायचा आहे. आम्ही गावात रोजगार आणि गरिबीवर आधारित रोजगार पोषक गाव, गिरीबी मुक्त गाव या थीमवर काम करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सामंत यांचे सहकार्य अपेक्षित आहे. शैक्षणिक विकास साधण्यासाठी ग्रामविकास मंडळाने सहकार्य करावे. भविष्यात ट्रॅक बदलून गावाचा विकास साधायचा आहे. शाश्वत रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्वांचे सहकार्य सर्वांनी करावे. गावात उद्योजक बनण्यासाठी सहकार्य करावे. यापुढे आर्थिक परिस्थिती नसल्याने शैक्षणिक वर्ष फुकट जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच सौ परब यांनी केले.