आवळेगावात दुमदुमला ''जरीमरी''चा जयघोष

आवळेगावात दुमदुमला ''जरीमरी''चा जयघोष

01407
आवळेगाव ः उपक्रमशील शिक्षक प्रवीण खरात यांना विठ्ठल रखुमाईची प्रतिमा देऊन विनायक सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आवळेगावात दुमदुमला ‘जरीमरी’चा जयघोष

वर्धापन दिन उत्साहात; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद

कुडाळ, ता. ८ ः आवळेगाव येथे जरीमरी देवीचा वर्धापनदिन नुकताच उत्साही वातावरणात आणि भाविकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. यानिमित्त जरीमरीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शामसुंदर सावंत यांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात होमहवन आणि श्रींच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले. आवळेगाव पाटकर टेम्ब येथे झालेल्या या कार्यक्रमात भाविक भक्तांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आवर्जून हजेरी लावली. मंदिर जीर्णोद्धारासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, प्रसिद्ध उद्योजक शेखर सावंत, ज्येष्ठ समाजसेवक विनायकअप्पा सावंत यांनी सहकार्य केल्याचे जाहीर करण्यात आले. माजी सरपंच जनार्दन सावंत, युवा कार्यकर्ते उदय सावंत आणि शैलेश ऊर्फ गणेश दुखंडे यांचे पुण्यस्मरणही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धार असल्याने अनेक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली. कार्यक्रमासाठी अनेकजणांनी सढळ हस्ते वस्तू आणि आर्थिक स्वरुपात देणगी जाहीर केली. गावातील मानकऱ्यांसह अनेकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्वप्रथम अद्भुत शांती होमहवन, श्रींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, हळदीकुंकू, हरिपाठ, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर म्हापण येथील अमृतनाथ सिद्धेश्वर कंपनीच्या दशावतारी नाटकाचाही आनंद रसिकांनी लुटला.
मान्यवरांच्या हस्ते रंगमंचाचे उद्‍घाटन झाल्यानंतर आवळेगाव पाटकर टेम्ब प्राथमिक शाळा आणि डिगस करिवणे टेम्ब येथील शारदा विद्यालयाच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध बहारदार नृत्याविष्कार आणि पोवाड्यानी रंगमंच दुमदुमून गेला. यावेळी दोन्ही शाळांच्या मुलांसहित शिक्षकांचा सन्मान श्री जरीमरी देवी सेवा मंडळातर्फे करण्यात आला. मंदिराची सुबक आणि आकर्षक रंगरंगोटी आवळेगाव पाटकर टेम्ब शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खरात यांच्या कुंचल्यातून झाल्याने मंडळाच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. सुनील सावंत, शरद सावंत, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्या तवटे, करंजेचे माजी सरपंच संतोष परब, उपसरपंच विवेक कुपेरकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रहास सावंत आणि विजय सावंत, प्रफुल्ल सावंत, शिवसैनिक लालू सावंत, अमित तावडे, आबा सावंत, पोलिस अंमलदार मंगेश जाधव, महावितरण कर्मचारी परब उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com