जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत 
मृणाल सावंत विजेती
जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

sakal_logo
By

01415
हरकुळ खुर्द ः येथील जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत विजेत्या मृणालला पारितोषिक देताना रमेश हुले, अजय हुले, विजय हुले, शरद केरकर आदी.

जिल्हास्तर नृत्य स्पर्धेत
मृणाल सावंत विजेती
कुडाळ, ता. ८ ः हरकुळ खुर्द (ता. कणकवली) येथील श्री माता कालिका देवी सेवा मंडळातर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली.
श्री माता कालिका देवी सेवा मंडळाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री माता कालिकादेवी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन ४ ते ७ मे दरम्यान करण्यात आले. यानिमित्त आयोजित खुल्या जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेत द्वितीय रमाकांत जाधव (देवगड), तृतीय पूर्वा मेस्त्री (कणकवली), उत्तेजनार्थ समर्थ गवंडे, श्रेयश पवार, तन्मयी हुले, ओवी तवटे यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. परीक्षण जगदीश राणे, सौ. राणे, सचिन कोंडस्कर यांनी केले. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष रमेश हुले, उपाध्यक्ष शरद केरकर, चिटणीस सिद्धेश हुले, उपचिटणीस अशोक बोभाटे, खजिनदार अभिनय हुले, उपखजिनदार विपुल बोभाटे, हरकूळ खुर्द मंडळ अध्यक्ष विजय हुले, उपाध्यक्ष अर्जुन हुले, जयप्रकाश हुले, चिटणीस अजय हुले, उपचिटणीस दीपक हुले, खजिनदार पंढरीनाथ केरकर, उपखजिनदार मयूर पारकर, सदस्य साक्षी तवटे, शीतल हुले, संकेत हुले, समीर हुले, मधुसुदन बोभाटे, नामदेव हुले, प्रकाश हुले, तुकाराम हुले, सुरेंद्र हुले, रोशन हुले, सीताराम हुले, एकनाथ हुले, निवेदिता हुले, अमिता हुले, प्राजक्ता हुले आदी उपस्थित होते.